मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI क्रेडिट कार्ड युजर्सना झटका! आता EMI ट्रान्झॅक्शन महागणार

SBI क्रेडिट कार्ड युजर्सना झटका! आता EMI ट्रान्झॅक्शन महागणार

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता तुम्हाला एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या ईएमआय व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: कोरोना काळात ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. अनेकजण त्याआधीपासूनच ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य देतात. क्रेडिट कार्डचा वापरही अनेक युजर्ससाठी सोयीचा ठरतो. कारण यामध्ये एखादी खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे ईएमआय स्वरुपात भरण्याची मुभा मिळते. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत (Alert for SBI Credit Card Holder) असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता तुम्हाला एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या ईएमआय व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जाहीर केले आहे की EMI व्यवहारांसाठी, कार्डधारकाला आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क (Processing Fee and Tax on EMI Transaction via SBI Credit Card) आणि त्यावर कर भरावा लागेल. हा नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

हे वाचा-राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण

व्याज शुल्काव्यतिरिक्त भरावे लागणार प्रक्रिया शुल्क

SBICPSL कडून रिटेल आउटलेट्स, अॅमेझॉन तसंच फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. हे शुल्क खरेदीचे EMI मध्ये रूपांतर केल्यानंतर जे व्याज आकारले जाते, त्या व्याज शुल्काव्यतिरिक्त आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन शुल्काची माहिती दिली आहे.

हे वाचा-कमी पैशातही लग्नाचा धुमधडाका आहे शक्य; लोकही होतील खूश!

प्रक्रिया शुल्क

EMI मध्ये यशस्वीरित्या रुपांतरित झालेल्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क लागू आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1 डिसेंबरपूर्वी केलेल्या कोणत्याही व्यवहारास या प्रोसेसिंग फीमधून सूट दिली जाईल. रिटेल आउटलेटवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना ईएमआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्काची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल. ऑनलाइन ईएमआय व्यवहारांसाठी, कंपनी पेमेंट पेजवर प्रोसेसिंग फीची  माहिती देईल. ईएमआय व्यवहार रद्द झाल्यास, प्रक्रिया शुल्क परत केले जाईल. तथापि, प्री-क्लोजरच्या बाबतीत ते परत केले जाणार नाही. ईएमआयमध्ये रूपांतरित केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत.

First published:

Tags: SBI, Sbi alert, SBI bank, SBI Bank News