• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • महाराष्ट्रातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रुपये! वाचा काय आहे कारण

महाराष्ट्रातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रुपये! वाचा काय आहे कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँक लि. वर (Laxmi Coop Bank Solapur) निर्बंध आणले आहेत. बँकेची दयनीय आर्थिक परिस्थिती पाहता आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  सोलापूर, 13 नोव्हेंबर: नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा अनियमित व्यवहार असल्यास देशातील केंद्रीय बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI Restriction on Banks in Maharashtra) देशभरातील बँकांवर निर्बंध आणले जातात किंवा कारवाई केली जाते. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँक लि. वर (Laxmi Coop Bank Solapur) निर्बंध आणले आहेत. बँकेची दयनीय आर्थिक परिस्थिती पाहता आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना पैसे काढताना केवळ 1000 रुपयांची रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी याबाबत निवेदन दिले आहे. यामध्ये RBI ने असं म्हटलं आहे की, बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत लादलेले निर्बंध 12 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाजाचे तास संपल्यानंतर सहा महिने लागू राहतील. यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाईल. आरबीआयने दिले निर्देश रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, लक्ष्मी सहकारी बँक मध्यवर्ती बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. तसेच, बँक कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही किंवा कोणतेही पैसे देणार नाही. बँकेला या सहा महिन्याच्या काळात पेमेंट करण्यास संमती नाही आहे. हे वाचा-लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किंमतीचा भडका! सोनं 9 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर सर्व बचत किंवा चालू खाती असणाऱ्यांना किंवा इतर खाती असणाऱ्या ठेवीदारांना खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही, असे निर्देश आरबीआयने दिले आहेत. आरबीआयनेही या बँकेवर लादले आहेत निर्बंध रिझव्‍‌र्ह बँकेने पुढे म्हटले आहे की, आरबीआयने दिलेल्या निर्देशांना बँकिंग परवाना रद्द करणे असे मानले जाऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील. आरबीआयने म्हटले आहे की ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला जातो, त्यांना अटींनुसार सेटलमेंटची परवानगी दिली जाऊ शकते. याआधीही आरबीआयने राज्यातील बाबाजी दाते महिला सहकारी बँक, यवतमाळ या बँकेवरअसेच निर्बंध लादले होते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: