मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमी पैशातही लग्नाचा धुमधडाका आहे शक्य; लोकही होतील खूश!

कमी पैशातही लग्नाचा धुमधडाका आहे शक्य; लोकही होतील खूश!

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोरोना निर्बंध (Corona restrictions) उठल्याने अनेकजण लग्नात होऊ दे खर्च म्हणत आहे. मात्र, आर्थिक घडी विस्कटल्याने पूर्वीसारखा विवाहात खर्च करणे (Spending on a wedding) सर्वांना शक्य नाही. पण, काळजी करू नका तुम्ही देखील कमी पैशात धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून देऊ शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 16 नोव्हेंबर: काल 15 नोव्हेंबरला राज्यभरात कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी पंढरपूरची यात्रा संपते. कार्तिकी एकादशीपासून (Kartiki Ekadashi) तुळसी विवाह (Tulsi marriage) सुरू होतात. यानंतर आपल्याकडे लग्नाचे बार उडवून द्यायला सुरुवात होते. कोरोना महामारी आल्याने मागील दोन वर्षात विवाह (Marriage) अगदीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच पार पडले. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने जवळपास सर्वच निर्बंध (restrictions) हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा बँडबाजा (Bandbaja) वरात दिसू लागली आहे. मात्र, कोरोनाने रोजगार गेले, व्यवसायांना फटका बसला, त्यामुळे पूर्वीसारखे मोठे विवाहसोहळे आता अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे काहींचा हिरमोड झाला असला तरी साध्या पद्धतीने विवाह करण्याला अनेकजण पसंती देत आहेत. कमी खर्चातही जोरदार विवाह कसा करायचा? याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

भारतीय संस्कृतीमध्ये लग्नसंस्थेला मोठं महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वांत जास्त खर्च हा त्याच्या लग्नातच होत असतो. भारतात सरासरी 10 ते 15 लाख रुपये एका लग्नाला खर्च येतो. पण, कोरोनामुळं काही बंधन असून यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत होती. आता निर्बंध उठल्याने कमी खर्चात लग्न कसं करायचं असा प्रश्न पालकांसमोर आहे.

विवाह काँप्रेस करा (Marriage Compress)

कोरोनाने अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे कमी पैशांत लग्न करून तो पैसा भविष्यासाठी साठवला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. मुलीच्या आईवडिलांनादेखील यामुळे मोठा फायदा होणार आहे. भारतीय संस्कृतीत लग्नाचा जास्त खर्च हा मुलीची बाजू करते. मात्र, आता निर्बंध उठवल्याने अनेकांना पुन्हा मोठी लग्न करावी वाटत आहे. हा विचार काही चुकीचा नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या विवाहाला सर्वांनी उपस्थिती लावावी, सर्व मित्रपरिवाराने याचा आनंद घ्यायला हवा. लग्न आयुष्यात एकदाच होते, त्यामुळे होऊदे खर्च. पण, सध्याची परिस्थिती पहाता विवाहातील अनावश्यक खर्च टाळायला हवा. यासाठी एक सुवर्णमध्य काढता येऊ शकतो. तुम्ही विवाहाचा खर्च काँप्रेस म्हणजे कमी करू शकता. आता तो कसा?

Wedding in Space : आता थेट अवकाशातच बांधा लग्नगाठ; अंतराळातही करता येणार विवाह सोहळा

कोणत्याही लग्नात वधु-वराच्या कपड्यांवर भरमसाठ खर्च होतो. हे कपडेही तुम्ही एकच दिवस वापरता. त्यामुळे हा खर्च कमी करता येऊ शकतो. बाजारात सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार विवाहासाठी कमी पैशात कपडे निवडू शकता.

बँडबाजा वरात..

लग्नात बँडबाजावरही भरपूर पैसे खर्च होतात. याठिकाणी मोठी साऊंड सिस्टीम लावण्यापेक्षा छोटा बँडबाजा लावता येईल. पैसेही वाचतील आणि तुम्ही होसही भागेल.

जेवणाचा खर्च

विवाहासाठी अजूनही 200 लोकच उपस्थित राहू शकतात. या नियमांचं पालन केलं तर तुमची इथंही मोठी बचत होईल.

लग्नात पंचपक्वान्न ठेवण्यापेक्षा मोजकेच पदार्थ ठेवावेत. जेणेकरुन अन्नाची नासाडी होणार नाही.

सर्वात महत्वाचं जेवणाची ऑर्डर देताना अंदाजपंचे सांगण्यापेक्षा जितके वऱ्हाडी येणार आहेत, तितकीच ताटे सांगवीत.

Wedding Season: देशभरात एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

कौटुंबिक विवाह

कोरोनामुळे नाईविलाजाने अनेकांना अशा प्रकारचे विवाह करावे लागले आहेत. यात कुटुंबातील जवळची लोकच उपस्थित असतात.

आपल्याकडे लग्न म्हटलं की गाड्या भरुन वऱ्हाडी मंडळी येत असतात. मात्र, याला फाटा देऊन कौटुंबिक विवाह केले तर मोठ्या खर्चाला फाटा देता येऊ शकतो.

मोठ्या मंडपात किंवा मंगल कार्यालयात विवाह करण्यापेक्षा घरासमोर किंवा गावाकडे असेल तर शेतात झाडांखालीही विवाह करण्याचा पर्याय चांगला आहे.

कौटुंबिक विवाह सोहळ्याचा सर्वात मोठा फायदा असा की सर्व कुटुंबाला याचा आनंद घेता येतो. मोठ्या विवाहात पाहुणेमंडळींकडेच लक्ष देण्यात सर्व वेळ जात असल्याने लग्न एन्जोय करता येत नाही.

डिजीटल लग्नपत्रिका

सध्याचा जमाना डिजीटल आहे. त्यामुळे त्याचा योग्य वापर आपणही करायला हवा.

पूर्वीसारख्या लग्नपत्रिका छापून त्या वितरीत करण्यात वेळ आणि पैसा दोन्ही जास्त जातो. त्याऐवजी डिजीटल लग्नपत्रिका छापून ती काही सेकंदातच जगभरात कुठेही पाठवता येऊ शकते.

डिजीटल लग्नपत्रिका पाठवून लोकांना Remind करणेही सोप्प आहे.

VIDEO: अरे हे काय! मंडपातच नवरदेवाचं Work From Wedding, पाहा नवरीची प्रतिक्रिया

सामाजिक कार्याचा संदेश

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पैशाची बचत करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. एका जोडप्याने कोविड सेंटरमध्येच विवाह करत बचत झालेल्या पैशातून आर्थिक मदत केली. त्यामुळे अशा प्रकारचा पर्याय तुम्ही निवडू शकता. जसे की वृद्धाश्रम, अनाथाश्रम..

बचत (Savings) केलेली रक्कम योजनेत गुंतवणे

समजा तुम्ही काही विशिष्ट रक्कम एफडीमध्ये गुंतवली तर तुम्हाला यावरील व्याज मिळू शकते. EPF,VPF, PPF, Equity funds यांसारख्या फंडांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. विविध बँकांमध्ये केलेल्या एफडीमध्ये तुम्हाला सहज 5 ते 6 टक्के परतावा मिळू शकतो. भविष्यात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी देखील तुम्ही या रकमेचा वापर करू शकता.

First published:

Tags: Marriage, Savings and investments, Wedding