मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या बँक खात्यावर आहे मोबाइल हॅकर्सची नजर, फसवणूक टाळण्यासाठी वाचा SBIच्या सूचना

तुमच्या बँक खात्यावर आहे मोबाइल हॅकर्सची नजर, फसवणूक टाळण्यासाठी वाचा SBIच्या सूचना

मोबाइल फोनमध्ये वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स यांसारखी महत्त्वाची माहिती असते. कोणत्याही फोनमध्ये अशाप्रकारे माहिती असणे धोक्याचे ठरू शकते.

मोबाइल फोनमध्ये वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स यांसारखी महत्त्वाची माहिती असते. कोणत्याही फोनमध्ये अशाप्रकारे माहिती असणे धोक्याचे ठरू शकते.

मोबाइल फोनमध्ये वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स यांसारखी महत्त्वाची माहिती असते. कोणत्याही फोनमध्ये अशाप्रकारे माहिती असणे धोक्याचे ठरू शकते.

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात (Coronavirus) देशात ऑनलाइन फ्रॉडचा आकडा वाढत आहे. यामुळे देशातील सर्वात मोठी बँक वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करत आहे. एसबीआयने (SBI) पुन्हा एकदा ट्विटरवरून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांना त्यांनी स्मार्टफोनद्वारे होणाऱ्या हॅकिंगसंदर्भात अलर्ट केले आहे. यातून हॅकर्स कसे नुकसान पोहोचवतात, याबाबतची माहिती एसबीआयने दिली आहे. दरम्यान, मोबाइल फोनमध्ये वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स यांसारखी महत्त्वाची माहिती असते. कोणत्याही फोनमध्ये अशाप्रकारे माहिती असणे धोक्याचे ठरू शकते. मोबाइलमध्ये ट्रोजन हॉर्स किंवा कोणत्याही प्रकारच्या व्हायरसचा हल्ला होऊ शकतो. यामुळे ग्राहकांनी त्यांच्या मोबाइलच्या सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे.

SBI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'मोबाइल हॅकर्सची शिकार बनू नका. तुमच्या डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी काही स्मार्ट उपायांबद्दल माहित करून घ्या. आपण हॅकर्सचे काम कठीण करूया'.

जाणून घ्या फोन हॅक होण्यापासून वाचण्यासाठी किंवा कोणत्याही रिस्कमधून वाचण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे-

1. तुमचा फोन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ठेवू नका

2. तुमच्या फोनमध्ये कोणतेही App वापरल्यानंतर ते बंद करा

(हे वाचा-डेबिट कार्ड विसरला असाल तरी देखील काढू शकता SBI ATM मधून पैसे, वाचा सविस्तर)

3. कोणत्याही अनोळखी नेटवर्कशी तुमचा फोन जोडू नका

4. व्हायरस प्रभावित डेटा कधीही दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये पाठवू नका

जाणून घ्या तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत?

1. तुमचा स्मार्टफोन डेटा नेहमी बॅकअप करत राहा

2. तुमच्या फोनचा युनिक IMEI नंबर तुमच्याकडे ठेवा.

(हे वाचा-केवळ 11 दिवसात सोन्याचे दर 4000 रुपयांनी उतरले, वाचा किंमतीत आज काय होणार बदल)

3.कोणत्याही अनधिकृत अॅक्सेसपासून वाचण्यासाठी तुमच्या फोनमध्ये लॉकस्क्रीनचा वापर करा

4. कोणत्याही मोबाइल किंवा कम्प्यूटरमध्ये डेटा ट्रान्सफर करण्याआधी त्याला अँटी व्हायरसच्या माध्यमातून स्कॅन करा

5. तुमच्या मोबाइलची ऑपरेटिंग सिस्टिम वेळोवेळी अपडेट करा

First published:
top videos

    Tags: SBI