नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना कार्डलेस कॅश विड्रॉलची (Cardless Cash Withdrawal) देखील सुविधा देते आहे. एसबीआयच्या या सुविधेअंतर्गत ग्राहक अत्यंत सहज एटीएममधून पैसे काढू शकतात. यासाठी त्यांना डेबिट कार्ड (Debit Card) ची देखील आवश्यकता नाही. डेबिट कार्डशिवाय SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडे एसबीआय योनो (SBI YONO) हे अॅप असणे गरजेचे आहे. दरदिवशी एसबीआय एटीएममधून एकूण 1.23 कोटी ट्रान्झॅक्शन केले जातात. जाणून घ्या काय आहे कार्डलेस कॅश विड्रॉलची प्रक्रिया 1. सर्वात आधी तुम्हाला एसबीआयचे बँकिंग अॅप YONO डाऊनलोड करावे लागेल 2. कार्डलेस व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना सर्वात आधी YONO cash option वर जावे लागेल. 3. याठिकाणी एटीएममध्ये एक सेक्शन असेल, जिथे ग्राहकांना किती रक्कम काढायची आहे ते टाकावं लागेल 4.यानंतर एसबीआय योनो कॅश ट्रान्झॅक्शन नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर पाठवेल 5. यानंतर खाते क्रमांक आणि एटीएम पिनच्या मदतीने कार्डलेस व्यवहार करता येईल (हे वाचा- केवळ 11 दिवसात सोन्याचे दर 4000 रुपयांनी उतरले, वाचा किंमतीत आज काय होणार बदल) 6. हा नंबर 4 तासांसाठी वैध असेल 7. यानंतर एसबीआय एटीएममध्ये गेल्यानंतर एटीएम मशिनच्या स्क्रीनवर ‘YONO Cash’चा पर्याय निवडावा लागेल 8. यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवण्यात आलेला योनो कॅश ट्रान्झॅक्शन नंबर टाकावा लागेल. 9. पुढील स्टेपमध्ये योनो कॅश पिन टाकल्यानंतर याला व्हॅलिडेट करावे लागेल 10. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून कार्डशिवाय पैसे तुमच्या हातात येतील (हे वाचा- फक्त 5 रुपयामध्ये खरेदी करा सोने, Amazon Pay ने सुरू केलं Gold Vault ) एसबीआयची कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा केवळ एसबीआय एटीएममध्येच उपलब्ध आहे. या सुविधेमुळे डेबिट कार्ड फ्रॉडचा धोका कमी होतो. एसबीआयच्या या सुविधेअंतर्गत ग्राहक कमीत कमी 500 तर जास्तीत जास्त 10000 रुपये काढू शकतो. जर तुम्ही या सुविधेअंतर्गत पैसे काढू शकत नाही आहात आणि तुम्ही केलेले ट्रान्झॅक्शन फेल झाले तरीही तुमचे पैसे कापले गेले, तर यासंदर्भात लवकरात लवकर ही माहिती बँकेकडे द्या. 7 वर्किंग दिवसांच्या आतमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.