मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केवळ 11 दिवसात सोन्याचे दर 4000 रुपयांनी उतरले, वाचा किंमतीत आज काय होणार बदल

केवळ 11 दिवसात सोन्याचे दर 4000 रुपयांनी उतरले, वाचा किंमतीत आज काय होणार बदल

देशांतर्गत बाजारात आता सोन्याच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. गेल्या 11 दिवसात दिल्लीतील सराफा बाजारात (Gold spot price) सोन्याचे भाव प्रति तोळा 4000 रुपयांनी कमी झाले आहेत.

    मुंबई, 21 ऑगस्ट : देशांतर्गत बाजारात आता सोन्याच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. गेल्या 11 दिवसात दिल्लीतील सराफा बाजारात (Gold spot price) सोन्याचे भाव प्रति तोळा 4000 रुपयांनी कमी झाले आहेत. अमेरितेतील कमजोर बेरोजगारीच्या आकड्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा 1940 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत. मात्र तज्ज्ञांकडून येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती उतरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आल्यामुळे सोन्याचांदीच्या (Latest Gold Silver Rates) किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र बेरोजगारी आणि मॅन्यूफॅक्चरिंग इंडेक्सच्या कमजोर आकड्यामुळे आर्थिक रिकव्हरीच्या आशेला झटका मिळाला. याचमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये कमीत स्तरावरील खरेदी पाहायला मिळाली. भारतात आणखी उतरणार सोन्याच्या किंमती? तज्ज्ञांच्या मते सद्यस्थितीत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात. टेक्निकल चार्टवर देखील सोने आता कमजोर दिसत आहे. दरम्यान आज सोन्याचे भाव (Gold Rates Today) स्थिर राहू शकतात किंवा काहीसा बदल होऊ शकतो. (हे वाचा-फक्त 5 रुपयामध्ये खरेदी करा सोने, Amazon Pay ने सुरू केलं Gold Vault) गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 54,311 रुपये प्रति तोळावरून 52,819 रुपये प्रति  तोळा झाली आहे. सोन्याच्या किंमती 1,492 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत.  मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती कमी होऊन 52528 रुपये प्रति तोळा आहेत. (हे वाचा-रोज 100 रुपये वाचवून इथे करा गुंतवणूक,15 वर्षात तुमची मुलं होतील 34 लाखांचे मालक) गुरुवारी सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये चांदीचे भाव 1476 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. त्यामुळे चांदीचे भाव 69,400 रुपयांवरून 67,924 रुपये प्रति किलो झाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचे दर 66448.00 रुपये प्रति किलो आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या