मुंबई, 20 सप्टेंबर : सरकारी बँक SBI आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील, याची काळजी घेत असते. बँक तुम्हाला झीरो बॅलन्स खातं उघडण्याची सुविधाही देते. आता या खात्यात ग्राहकांना अनेक सुविधा मोफत मिळणार आहेत. RBI नं झीरो बॅलन्स खात्यांच्या नियमात अनेक बदल केलेत. नवे नियम 1 जुलैपासून लागू होतील. कसं उघडायचं झीरो बॅलन्स खातं? 1. झीरो बॅलन्स खातं - अशा प्रकारच्या खात्याला BSBD अकाउंट म्हटलं जातं. SBI चं BSBD अकाउंट इतर खात्याप्रमाणे सहज उघडता येतं. तुम्हाला KYC चे नियम पूर्ण करावे लागतील. हे अकाउंट सिंगल किंवा जाॅइंट उघडता येतं. देशभरातल्या स्टेट बँकेच्या सर्व शाखांमध्ये तुम्ही हे अकाउंट सुरू करू शकता. ‘या’ व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई 2. SBI ची अनेक अकाउंट्स आहेत झीरो बॅलन्स - फाइनॅन्शियल इन्क्ल्युजन अकाउंट्स, बेसिक सेविंग बँक डिपाॅझिट अकाउंट्स, स्माॅल अकाउंट्स, प्रायमरी अकाउंट होल्डर, पेन्शनर अकाउंट, सॅलरी अकाउंट अशी अनेकविध खाती झीरो बॅलन्सचीच आहेत. हाय कोर्टात नोकरीची मोठी संधी, ‘या’ उमेदवारांना आहे पसंती 3. आता या सेवा मिळतील मोफत - SBIनं सांगितलंय की, झीरो बॅलन्स खात्यात अनेक सुविधा फ्री आहेत. म्हणजे ATM कार्ड, इंटरनेट बँकिंग सर्विस, ATMमधून महिन्यातून 4 वेळा मोफत पैसे काढण्याची सोय अशा सेवा मिळणार आहेत. ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी करा अर्ज 4. खात्याचं वैशिष्ट्य - यात कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. स्टेट बँकेच्या दुसऱ्या बचत खात्यात वर्षाला जितकं व्याज मिळतं, तितकंच याही खात्यात मिळू शकतं. इतर खात्यांप्रमाणे याही खात्यात रुपे डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगची सुविधा मिळेल. SPECIAL REPORT: राणेंचा ‘स्वाभिमान’ राहिला कुठे? भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.