हाय कोर्टात नोकरीची मोठी संधी, 'या' उमेदवारांना आहे पसंती

हाय कोर्टात नोकरीची मोठी संधी, 'या' उमेदवारांना आहे पसंती

Job, Recruitment - नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालयात मोठी संधी आहे

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : तुम्ही वकिलीचा अभ्यास केला असेल तर नोकरीची चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयात 51 जागांवर भरती आहे. लाॅ क्लार्क या पदांवर ही भरती केली जाईल. मुंबईबरोबर नागपूर आणि औरंगाबाद इथेही व्हेकन्सी आहेत.

खंडपीठ आणि पदसंख्या

मुंबई- 23

नागपूर - 14

औरंगाबाद - 14

LIC मध्ये नोकरीची मोठी संधी, 8500 जागांवर होणार भरती

शैक्षणिक पात्रता

पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण हवं. किंवा LLM ही पदवी हवी.

वयाची अट

21 ते 30 वर्षापर्यंत वय हवं.

अर्जाची फी नाही. अर्ज 1 ऑक्टोबर 2019पर्यंत पाठवावा.

ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

अर्ज पाठवण्याचा पत्ता

द रजिस्टारर, हाय कोर्ट, अपेलॅट साइड, बाॅम्बे, 5वा मजला, नवी मंत्रालय बिल्डिंग, जी.टी. हाॅस्पिटल कम्पाउंड, अशोका शाॅपिंग सेंटर, क्राॅफर्ड मार्केटच्या जवळ, एल.टी.मार्ग, मुंबई - 400001 (The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001)

अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1jK1WAd1atS0ybjdM8nQyABfADDRC81uo/view इथे क्लिक करा.

तसंच, LIC मध्ये मेगा भरती आहे. भारतीय आयुर्विमा मंडळात 8500 पदांवर भरती केली जाणार आहे. क्लार्क, कस्टमर सर्विसेस एक्झिक्युटिव्ह, सिंगल विंडो ऑपरेटर या पदांसाठी ही भरती आहे. या 8500 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही https://www.licindia.in/ इथे क्लिक करा.

आजपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात झालीय. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019.  ऑनलाइन परीक्षेची तारीख आहे 21 आणि 22 ऑक्टोबर 2019. काॅल लेटर डाऊनलोडची तारीख 15 ऑक्टोबर 2019. पूर्व परीक्षेची तारीख आहे  22 ऑक्टोबर 2019.

VIDEO : 'मला पण जत्रेला येऊ द्या', मोदींच्या सभेत महिलांनी धरला ठेका

First published: September 19, 2019, 6:24 PM IST
Tags: jobs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading