जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NABARD Recruitment : ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

NABARD Recruitment : ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

NABARD Recruitment : ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

Nabard Recruitment - बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी घालवू नका

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत नोकरीची संधी आहे. 91 जागांवर भरती होणार आहे. डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पद आणि पदसंख्या डेव्हलपमेंट असिस्टंट - 82 डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) - 9 हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 9 पदांसाठी 164 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज शैक्षणिक पात्रता डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  हवी. आरक्षित उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण असण्याची गरज आहे. बँकेत नोकरीची मोठी संधी, राज्यात 1257 जागांवर भरती,‘अशी’ होईल परीक्षा डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) या पदासाठी 50% गुणांसह हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवी हवी. आरक्षित उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण असणं हवं. वयाची अट 1 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्ष पूर्ण हवेत.  SC/ST साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्ष सूट हवी. अर्जाची फी जनरल आणि ओबीसी - 450 रुपये. SC/ST/PWBD/ExSM साठी 50 रुपये. पूर्व परीक्षा 20 ऑक्टोबर 2019ला घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2019. अधिक माहितीसाठी https://www.nabard.org/ इथे क्लिक करा. NITI Aayog Recruitment 2019 : ‘या’ पदांवर व्हेकन्सी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त तसंच, हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत व्हेकन्सी आहे. प्रोजेक्ट इंजिनीयर, लाॅ ऑफिसर आणि HRO अशा 9 पदांसाठी 164 व्हेकन्सीज निघाल्यात. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी hindustanpetroleum.com  इथे जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. पद आणि पद संख्या मेकॅनिकल प्रोजेक्ट इंजीनियर: 63 सिविल प्रोजेक्ट इंजीनियर: 18 इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजीनियर: 25 इन्स्ट्रुमेंटेशन प्रोजेक्ट इंजीनियर: 10 केमिकल रिफायनरी इंजीनियर: 10 लॉ ऑफिसर: 4 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर: 20 ह्युमन रिसोर्स ऑफिसर: 8 फाइन अॅण्ड सेफ्टी ऑफिसर: 6 या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव हवा. उमेदवाराची निवड लिखित परीक्षा, इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन याद्वारे होईल. गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jobs
  • First Published :
जाहिरात
जाहिरात