'या' व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई

Modi Government- सरकारची मदत घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 12:32 PM IST

'या' व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई

मुंबई, 20 सप्टेंबर : तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल तर चांगली संधी आहे. मोदी सरकार मत्स्यपालनाला मदत करणार आहे. सरकार तुम्हाला कर्ज देईलच पण योग्य मार्गदर्शनही करेल.  भारत सरकारच्या पशुपालन, डेअरी आणि मत्स्यपालन मंत्रालयानं काही योजना सुरू केल्यात. आर्थिकदृष्या मागासलेल्या लोकांना यातून फायदा होणार आहे.

सरकार खर्च करणार 25 हजार कोटी रुपये

केंद्रीय पशुपालन, डेअरी आणि मत्स्यपालन मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितलं की, केंद्र सरकार मत्स्यपालन क्षेत्रात 25 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. छोट्या मच्छिमारांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय.

अर्थमंत्र्यांचे कंपन्यांसाठी सरप्राईझ; शेअर बाजारात दिवाळी!

मत्स्यपालन का फायदेशीर?

Loading...

सरकार यावर युद्धपातळीवर काम करतंय. बेरोजगार तरुण, शेतकरी यांची मिळकत वाढण्यासाठी हे योजलं जातंय. या व्यवसायात फायदा आहे. कारण देशात 60 टक्क्यांहून जास्त लोक मासे खाणं पसंत करतायत.

दोन महिन्यातला पेट्रोल-डिझेलचा सर्वात जास्त दर, 'या' आहेत आजच्या किमती

सुरू करा मत्स्यपालन

आपल्या देशात समुद्र, नदी, तलाव यांची कमी नाही. जमीनही खूप आहे, तिथे तलाव, टाक्या बनवता येतील. आता मासे पकडण्याचं जुनं तंत्रही बंद होतंय. आता लोकांनी कृत्रिम तलाव आणि टाक्या तयार करून त्यात माशांचा व्यवसाय सुरू केलाय.

या प्रोजेक्टसाठी 20 लाख रुपये गुंतवावे लागतील

यात कॅपिटल किंमत 9.70 लाख रुपये आणि ऑपरेशनल किंमत 10.36 लाख रुपये असेल. पण तुम्हाला फक्त 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पैसे तयार ठेवावे लागतील. केंद्र सरकार तुम्हाला जवळजवळ 8 लाख रुपये आणि राज्य सरकार जवळजवळ 4 लाख रुपये सबसिडी देईल. याशिवाय सरकार 4 ते 5 लाख रुपये बँक कर्जही देईल. मोदी सरकार राज्य सरकारांसोबत एक स्कीम चालवतंय, त्यात मत्स्यपालनासाठी सरकार जवळजवळ 75 टक्के आर्थिक सहाय्य करणार आहे.

रोज 22 रुपये खर्च करून घेता येईल LIC पाॅलिसी, मिळतील 'हे' फायदे

किती होईल कमाई?

तुम्ही आरएएस तंत्रानं मत्स्यपालन करणार असाल तर फक्त 5 लाख रुपयांची सोय करावी लागेल. यात तुम्ही 20 हजार किलोग्रॅम वजनाचे मासे पाळू शकता. यामुळे तुमचा ग्राॅस इन्कम जवळजवळ 15 लाख रुपये होईल आणि नेट इन्कम 4.64 लाख रुपये होईल.

'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...