तुमच्या SBI खात्यात ही माहिती अपडेट करा नाहीतर पैसे काढणं होणार कठीण

तुमच्या SBI खात्यात ही माहिती अपडेट करा नाहीतर पैसे काढणं होणार कठीण

तुम्ही तुमचा मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलला आहे का? असं असेल तर ही दोन्ही प्रकारची माहिती तुम्ही तुमच्या बँक खात्यात अपडेट करणं आवश्यक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : तुम्ही तुमचा मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलला आहे का? असं असेल तर ही दोन्ही प्रकारची माहिती तुम्ही तुमच्या बँक खात्यात अपडेट करणं आवश्यक आहे.

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती अपडेट केली तर बँक खात्याशी संबंधित व्यवहारांबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्याचबरोबर बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांपासून तुम्हाला खबरदारी घेता येईल.

बँक रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई मेल आयडीवर OTP, पिन अॅक्टिव्हेशन मेसेज अशी माहिती शेअर करते. तुमच्या बँक खात्यात तुमचा मोबाइल नंबर अपडेट नसेल तर तुम्ही रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू शकणार नाही.

(हेही वाचा : आर्थिक मंदीचा फटका, यावर्षी कमी होणार 16 लाख नोकऱ्या)

SBI ने नुकताच एक निर्णय घेतला आहे. 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यासाठी OTP ची आवश्यकता आहे.

आपल्या बँक रेकॉर्डमध्ये मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी अपडेट करण्याच्या सूचना बँकेने मागच्याच आठवड्यात ट्वीट करून दिल्या होत्या.

(हेही वाचा : खूशखबर! सलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव)

खातं अपडेट करण्यासाठी हे करा

यासाठी तुम्हाला SBI च्या इंटरनेट बँकिंग अकाउंटमध्ये लॉग इन करावं लागेल.लॉग इन केल्यानंतर तुम्ही 'My Accounts & Profile' या सेक्शनमध्ये जा.या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Profile या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यासाठी तुम्हाला 'Personal Details/Mobile' हा पर्याय निवडावा लागेल.त्यानंतर तुम्ही क्विक कॉन्टॅक्ट वर क्लिक करा आणि मग एडिट हा पर्याय निवडा.इथे तुम्ही तुमचा नवा मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी टाका.यानंतर OTP जनरेट करून याठिकाणी भरा.OTP भरल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

========================================================================================

Tags: moneySBI
First Published: Jan 13, 2020 07:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading