नवी दिल्ली, 13 जानेवारी : सोनं आणि चांदीची खरेदी करायची असेल तर एक चांगली बातमी आहे. सोन्याच्या किंमती सलग तिसऱ्या दिवशी घसरल्या आहेत. सोमवारी सोन्याचा भाव 236 रुपयांनी घटला. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही घट आलीय. एक किलो चांदीचा भाव 376 रुपयांनी घटलाय. सोन्याचे नवे दर दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 40 हजार 432 रुपये प्रतितोळा झालेत. गेल्या 3 दिवसांत सोनं 1 हजार 082 रुपयांनी स्वस्त झालंय. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 47 हजार 635 रुपये किलो झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 550 डॉलर प्रतिऔंस झाली तर चांदी 17. 97 डॉलर प्रतिऔंस झाली. का घटल्या सोन्या-चांदीच्या किंमती? HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने आणि परदेशी बाजारात सोन्याची विक्री झाल्याने घरगुती बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. (हेही वाचा : सामान्यांना झटका! महागाई आणखी वाढणार, गेल्या 5 वर्षांतला उच्चांक) गोल्ड ETF मध्ये वाढली गुंतवणूक गुंतवणूकदारांनी 2019 मध्ये गोल्ड एक्सेंज ट्रेडेड फंड (ETF)मध्ये 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्याआधी गुंतवणूकदार गोल्ड ETF मधून पैसे काढून घेत होते. मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट अॅडव्हायजर इंडियाचे अॅनॅलिस्ट मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव यांच्या मते, इराण आणि अमेरिकेतला वाढता तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान होण्याची शक्यता यामुळे गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक वाढू शकते. वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. =========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.