नवी दिल्ली, 13 जानेवारी : आर्थिक मंदीचा (Economic Slowdown)देशभरातल्या रोजगार निर्मितीला फटका बसला आहे. या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत नवी रोजगार निर्मिती कमी झाली. एका रिपोर्टनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 लाख नोकऱ्या कमी होतील, असा अंदाज आहे. मागच्या वर्षी एकूण 89.7 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. SBI रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या नुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा अशा राज्यांमधले जे लोक नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेले त्यांच्याकडून घरी पाठवल्या जाणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी झालं आहे. यावरूनच कामगारांची संख्या कमी झाल्याचं लक्षात येतं. याचं कारण काय? कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)ने दिलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 मध्ये 89.7 लाख नवे रोजगार निर्माण झाले. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र यासारख्या राज्यांत रोजगाराच्या संधी होत्या आणि तिथूनच कामगार घरी पैसे पाठवत होते. पण आता तेही प्रमाण कमी होण्याची चिन्हं आहेत. (हेही वाचा : खूशखबर! सलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव) गेल्या आर्थिक वर्षात ज्यांना रोजगार मिळाले त्यांचं जास्तीत जास्त उत्पन्न मासिक 15 हजार रुपये एवढं होतं. रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑक्टोबर या काळात EPFO शी संलग्न असलेले 43.1 लाख नवे खातेधारक वाढले. सरकारसमोर आव्हान आर्थिक मंदीसोबतच महागाईचा दरही वाढल्यामुळे सरकारसमोरची आव्हानं गंभीर झाली आहेत. त्यातच आता या रिपोर्टनुसार देशात नोकरीच्या संधी कमी होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारला या समस्यांवर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. (हेही वाचा : प्रत्येक कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ATMवर मिळणार या 10 सेवा फ्री) =============================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







