नवी दिल्ली, 11 जानेवारी : बँकेकडून वेळोवेळी आपल्या ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स दिल्या जातात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (State bank of India) आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. ग्राहकांची फसवणुक होऊ नये म्हणून सावधानता बाळगण्याबाबत बँकेने काही गोष्टी सांगितल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of india) ग्राहकांसाठी एटीएम (ATM) वापरताना काय काळजी घ्यावी यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. देशभरात वाढणाऱ्या ऑनलाईन फ्रॉडमुळे बँकने ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
एटीएम (ATM) कार्ड वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी -
- ATM मध्ये पिनची एन्ट्री करताना ती काळजीपूर्वक करा. शक्य झाल्यास हाताने झाकून करा.
- एटीएम कार्ड, पिन (PIN) आणि इंटरनेट बँकिंग (Internet Banking) यासंबंधीचा तपशील कोणालाही देऊ नका.
- डेबिट कार्डवर कधीही पिन (PIN) लिहू नका. तो लक्षातच ठेवा.
- पिन नंबर कुणालाही सांगू नका. कोणतीच बँक एटीएम पिन नंबर विचारत नाही. कोणत्याही प्रकारच्या इमेल आणि फोनला रिस्पॉन्स देऊ नका.
- एटीएम कार्डचा पिन नंबर ठेवताना आपली जन्मतारीख किंवा बँकेतील अकाउंट नंबर पिन म्हणून ठेवू नका.
- एटीएममधून मिळालेली रिसिट चुकूनही तिथे फेकू नका.
- पैसे काढण्याआधी एटीएम रूममध्ये स्पाय कॅमेरा आहे की नाही याचा तपास करा.
- ATM मधील कीपॅड योग्य आहे की नाही हे तपासावे.
- बँकेतील खात्याशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडा. यामुळे खात्यावरील व्यवहार तुम्हाला मेसेजच्या रूपाने कळतील.
Your ATM CARD & PIN are important. Here are some tips to keep your money - safe & secured. For information, please visit - https://t.co/GY67vPYZL2 pic.twitter.com/uAhICqYKSE
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 6, 2021
याशिवाय, आपल्या कार्डची माहिती कुणालाही सांगू नका. तुमचा एटीएम पिन, कार्ड नंबर, अकाउंट नंबर आणि ओटीपी कुणाबरोबर शेअर करू नका. यासंदर्भात देखील बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सूचना दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.