भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा, लसीकरण सुरू झाल्यानंतर आणखी गती येणार; ASSOCHAM चा दावा

भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा, लसीकरण सुरू झाल्यानंतर आणखी गती येणार; ASSOCHAM चा दावा

ग्राहकांचा विश्वास, आर्थिक बाजार (Financial Markets), मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing) आणि एक्सपोर्ट (Export) यावर केल्या जाणाऱ्या मेहनतीवर ही सुधारणा पाहायला मिळत आहे. त्याशिवाय कोरोना वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू होण्यामुळे अर्थव्यवस्थेत अधिक सुधारणा होण्याची आशा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) 2021 मध्ये चांगली सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ASSOCHAM ने सांगितलं की, इंडियन इकोनॉमीमध्ये वी-शेप (V Shape) सुधारणा होत आहे. या संघटनेनुसार, ग्राहकांचा विश्वास, आर्थिक बाजार (Financial Markets), मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing) आणि एक्सपोर्ट (Export) यावर केल्या जाणाऱ्या मेहनतीवर ही सुधारणा पाहायला मिळत आहे. त्याशिवाय कोरोना वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू होण्यामुळे अर्थव्यवस्थेत अधिक सुधारणा होण्याची आशा आहे.

ASSOCHAM चे सरचिटणीस दीपक सूद यांनी सांगितलं की, चांगल्या आकड्यांमुळे (High Frequency) 2021 मध्ये वी-शेपमध्ये सुधारणा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. 2020 च्या शेवटच्या दोन महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेत याचे स्पष्ट संकेत दिसले आहेत. भारताच्या GDP मध्ये 2020-21 मध्ये 7.7 टक्के घसरण होण्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरला मोठं नुकसान झालं आहे. सरकारी आकड्यांनुसार, ही बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.

(वाचा - फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप विरोधात व्यापारी संघटना; CAIT ने सरकारला लिहिलं पत्र)

आर्थिक व्यवहारात सुधारणा -

कोरोना वॅक्सिनला (Corona Vaccine) मंजुरी मिळाल्यानंतर, भारतात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरणाला (Vaccination Program) सुरुवात होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. हॉस्पिटॅलिटी, ट्रान्सपोर्ट, इंटरटेनमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये याचा परिणाम दिसेल. ही सर्व क्षेत्र कोरोनामुळे प्रभावित झाली होती.

(वाचा - मोदी सरकार देतेयं, स्वस्त दरात सोने खरेदीची संधी; जाणून घ्या किंमत)

महाराष्ट्रात जीएसटी कलेक्शनमध्ये 7 टक्के वाढ -

दीपक सूद यांनी सांगितलं की, राज्यातील आकडेवारीनुसार, ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा परिणाम झाला. राज्यात जीएसटी कलेक्शनमध्ये (GST Collection) 7 टक्के वाढ झाली आणि एका वर्षाच्या आधारे जीएसटीच्या एकूण संग्रहात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच बजेट 2021-22 अर्थव्यवस्था (Union Budget 2021-21) सुधारणा होण्यास मदतशीर ठरेल.

Published by: Karishma Bhurke
First published: January 11, 2021, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading