SBI ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेत पैसे भरण्याच्या आणि काढण्याच्या नियमात बदल

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेत पैसे भरण्याच्या आणि काढण्याच्या नियमात बदल

जर तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI State Bank of India) आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये SBI ने त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : जर तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI State Bank of India) आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये SBI ने त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम एटीएम व्यवहार (ATM Transation), मिनिमम बॅलेन्स (Minimum Balanace) आणि एसएमएस शुल्क (SMS Charges) या संबंधित आहेत.

1. स्टेट बँक ऑफ इंडियाने जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये (ATM Withdrawal Rules) बदल केले आहेत. जर या नियमांचे पालन केले नाही तर ग्राहकांना दंड द्यावा लागेल. एसबीआयची वेबसाइट sbi.co.in वरील माहितीनुसार, SBI मेट्रो शहरांमध्ये त्यांच्या बचत खातेधारकांना एटीएममधून प्रत्येक महिन्याला 8 मोफत व्यवहार करण्याची सूट देते. ही मर्यादा पार केल्यानंतर ग्राहकांना व्यवहारावर शुल्क द्यावे लागेल.

(हे वाचा-जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, वाचा सविस्तर)

2. SBI ने 18 ऑगस्ट रोजी ग्राहकांना अशी खुशखबर दिली आहे की आता बचत खातेधारकांना कोणतेही एसएमएस शुल्क द्यावे लागणार नाही. हे शुल्क बँकेकडून माफ करण्यात आले आहे.

3. एसबीआयने एटीएममधून 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्याच्या नियमात बदल केले आहे. जर तुम्ही 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढणार असाल तर तुम्हाला ओटीपी (OTP)द्यावा लागेल. बँकेच्या या सुविधेअंतर्गत खातेधारकांना रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल. एसबीआय एटीएममध्ये ही सुविधा मिळेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे तुम्ही नेहमीप्रमाणे काढू शकता. एसबीआय एटीएममधून या दिलेल्या वेळेत पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी येईल.

(हे वाचा-ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या Netmedsमध्ये रिलायन्सने खरेदी केली मोठी भागीदारी)

4 . एसबीआय त्यांच्या बचत खातेधारकांकडून कमीतकमी रक्कम खात्यामध्ये न ठेवल्यास (non-maintenance of monthly average balance)  कोणतेही शुल्क घेणार नाही. यावर्षी मार्चमध्ये एसबीआयने अशी घोषणा केली होती की, बँकेने सर्व बचत खात्यासाठी सरासरी मासिक कमीतकमी रक्कम ठेवण्याची अनिवार्यता रद्द केली आहे. यामुळे ग्राहकांना झिरो बॅलेन्सची सुविधा मिळाली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 9:45 AM IST

ताज्या बातम्या