पीटीआयच्या वृत्तानुसार, लवकरच जुने सोने आणि दागिने विकण्यावर जीएसटी (GST) आकारला जाऊ शकतो. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक (Thomas Isaac) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की, राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समुह (GOM) मध्ये जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी आकारण्याच्या प्रस्तावाला जवळपास मंजूरी मिळाली आहे.
सोन्याच्या विक्रीवर किती कर?- काही लोकांनाच माहित आहे की, सोने खरेदीबरोरच सोने विक्रीवर देखील कर द्यावा लागतो. सोनेविक्री करताना हे पाहिले जाते की, तो दागिना तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावधीनुसार कर लागू होतो. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावा लागतो.