ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या Netmedsमध्ये रिलायन्सने खरेदी केली मोठी भागीदारी, 620 कोटींचा करार

ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या Netmedsमध्ये रिलायन्सने खरेदी केली मोठी भागीदारी, 620 कोटींचा करार

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. (Reliance Retail Ventures Ltd- RRVL) ने मंगळवारी चेन्नई स्थित Vitalic Health Pvt. Ltd आणि त्यांची सहाय्यक फार्मा कंपनी नेटमेड्स (Netmeds) मधील मोठी भागीदारी खरेदी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : रिलायन्स समुहाच्या (RIL) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. (Reliance Retail Ventures Ltd- RRVL) ने मंगळवारी चेन्नई स्थित Vitalic Health Pvt. Ltd आणि त्यांची सहाय्यक कंपनी नेटमेड्स (Netmeds) मधील मोठी भागीदारी खरेदी केली आहे. रिलायन्स रिटेलनने  Vitalic Health Pvt. Ltd च्या इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये 60 टक्के होल्डिंगसह या कंपनीच्या सहाय्यक कंपनी Tresara, Netmeds आणि Dadha Pharma चा 100 टक्के थेट मालकी हक्क खरेदी केला आहे. ही एकूण भागीदारी 620 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. रिलायन्स समुहाचा विस्तार करण्यासाठी करण्यात आलेली ही एक मोठी गुंतवणूक आहे.

आरआरव्हीएलच्या संचालक ईशा अंबानी (Isha Ambani) यांनी अशी माहिती दिली की, 'ही गुंतवणूक भारतामध्ये सर्वांसाठी डिजिटल पोहोच प्रदान करण्याच्या आम्ही दिलेल्या आश्वासनाशी निगडीत आहे. नेटमेड्स जोडले गेल्यामुळे उत्तम दर्जाचे आणि परवडणारे हेल्थकेअर प्रोडक्ट्स आणि सेवा देण्याची रिलायन्स रिटेलची क्षमता वाढली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दैनंदिन गरजा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विस्तृत करेल.'

(हे वाचा-Gold Price Today : सोन्याच्या दरात या आठवड्यातील सर्वात मोठी उसळी, वाचा नवे भाव)

त्यांनी अशी माहिती दिली की, नेटमेड्सने कमी काळातच देशामध्ये त्यांच्या ऑनलाइन व्यवसायाचा विस्तार केला आहे आणि यामुळे आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. त्यांनी असे म्हटले की या गुंतवणुकीमुळे या व्यवसायात आणखी वेगाने वाढ होईल.

2015 पासून व्हिटालिक आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्या फार्मा उत्पादनांचे वितरण आणि विक्रीच्या व्यवसायात आहेत. ही कंपनी ग्राहकांना फार्मासिस्टशी जोडण्यासाठी आणि औषधे, पौष्टिक आणि निरोगी उत्पादनांची दारापर्यंत डिलिव्हरी करण्यासाठी नेटमेड्स नावाचा ऑनलाइन फार्मसी प्लॅटफॉर्म देखील चालवते.

(हे वाचा-मोठी बातमी! बंद होतेय देशातील ही सरकारी कंपनी, वाचा कर्मचाऱ्यांचे काय होणार)

'रिलायन्स कुटुंबामध्ये सामील होणे आणि चांगल्या दर्जाच्या परवडणाऱ्या आणि सर्वांपर्यंत पोहोचवणारे हेल्थकेअर भारतीयांपर्यंत पोहचवण्यासाठी एकत्र काम करणे ही खरोखर 'नेटमेड्स'साठी अभिमानाची बाबत आहे', अशी  प्रतिक्रिया नेटमेड्सचे संस्थापक आणि सीईओ प्रदीप दाधा यांनी दिली आहे. नेटमेड्स हे एक संपूर्ण परवानाकृत ई-फार्मा पोर्टल आहे.  जे इतर आरोग्य उत्पादनांसह अधिकृत आणि ओव्हर द काउंटर (ओटीसी) औषध देते. याअंतर्गत पॅन इंडिया स्तरावर 20,000 हून अधिक पिन कोड्सवर प्रिस्क्रिप्शन औषधे ऑनलाइन खरेदीनंतर पोहोचवण्यात येतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या