मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI अलर्ट! अजिबात करू नका या 5 चुका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

SBI अलर्ट! अजिबात करू नका या 5 चुका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. सणासुदीच्या काळात काही खरेदी करताना किंवा कोणताही खर्च करताना या 5 चुका टाळा. अन्यथा तुमच्या खिशाला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. सणासुदीच्या काळात काही खरेदी करताना किंवा कोणताही खर्च करताना या 5 चुका टाळा. अन्यथा तुमच्या खिशाला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. सणासुदीच्या काळात काही खरेदी करताना किंवा कोणताही खर्च करताना या 5 चुका टाळा. अन्यथा तुमच्या खिशाला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : गेल्या काही काळापासून बँक फ्रॉड तसंच ऑनलाइन फ्रॉडमध्ये (Online Fraud) मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमिवर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India SBI) त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना एटीएम फ्रॉड होण्याची शक्यता देखील असते. ग्राहकांचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

सणासुदीच्या काळात जेव्हा पैशांची गरज असते  तेव्हा ग्राहकांनी या 5 चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या एसबीआयने कोणत्या 5 चुकांबाबत त्यांच्या ग्राहकांना सावधान केले आहे-

1. कुणाबरोबरही शेअर करू नका OTP, PIN, CVV आणि UPI PIN

बँक ट्रान्झॅक्शन करताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी, पिन क्रमांक त्याचप्रमाणे तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डवरील सीव्हीव्ही कुणाशीही शेअर करू नका. अधिकतर फसवणुकीचे प्रकार फोन कॉल द्वारे ओटीपी किंवी सीव्हीव्ही दिल्यामुळे झाले आहेत. तुम्ही असे केल्यास त्वरीत बँकेशी संपर्क करा.

(हे वाचा-सरकारी कंपनीची मोठी घोषणा,दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार 68500 रुपये)

2. बँकेशी संबंधित माहिती फोनमध्ये सेव्ह करणे टाळा

तुमच्या बँक खात्या संबंधित माहिती फोनमध्ये सेव्ह करणे टाळा. एसबीआयच्या मते, तुमचा बँक खाते क्रमांक,पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर किंवा त्याचा फोटो फोनमध्ये सेव्ह करण्यामध्ये जोखीम आहे. डिजिटल चोरी करणारे याचा वापर करून तुमच्या खात्यावर डल्ला मारू शकतात.

3. एटीएम  कार्डची माहिती शेअर करू नका

तुमचे एटीएम कार्ड केवळ तुम्हीच वापरले पाहिजे. ATM चे डिटेल्स कुणाबरोबरही शेअर करू नका. तुमचे बँक डिटेल्स लीक होण्याची शक्यता यामपळे बळावते. तुमच्या परवानगीशिवाय खात्यातील पैशांमध्ये फेरफार होऊ शकतो.

4.पब्लिक डिव्हाइस, ओपन वायफाय द्वारे आर्थिक व्यवहार टाळा

पब्लिक डिव्हाइस, ओपन नेटवर्क किंवा फ्री वायफाय  वरून आर्थिक ऑनलाइन व्यवहार करणे टाळा. एसबीआयच्या मते याद्वारे ग्राहकांची माहिती चोरी केली जाऊ शकते. ऑनलाइन फसवणुकीचा धोका यामध्ये सर्वाधिक आहे.

(हे वाचा-Gold Price : नवरात्रौत्सवात सोनं खरेदीचा प्लॅन आहे? इथे वाचा सोन्याचे नवे दर)

5. बँकेकडून ही माहिती कधीही विचारली जात नाही

संवेदनशील माहिती जसे की, युजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, व्हीपीए (UPI) कधीही बँकेच्या प्रतिनिधींकडून विचारली जात नाही. त्यामुळे अशी माहिती घेण्यासाठी कुणाचा फोन आलाच तर तो नंबर ब्लॉक करा, त्यावर कोणतीही माहिती देऊ नका.  हा कॉल फिशिंगचा असू शकतो.

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi alert, Sbi ATM, SBI bank