नवी दिल्ली,17 ऑक्टोबर : या आठवड्यामध्ये सोन्याचे दर (Gold Price) घसरल्याचे पाहायला मिळाले असले तरीही, शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्याआधी सलग 3 दिवस सोन्याचे दर उतरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा सपोर्ट देशांतर्गत बाजारीतल किंमतीना मिळाल्याने सोन्याचे दर वाढले आहे. कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चितता आहे, काही देशांनी लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचे नवे दर (Gold Rates) सलग तीन दिवस सोन्याचे दर उतरल्यानंतर शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 324 रुपयांने वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,704 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 51,380 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या मौल्यवान धातूची किंमत 1,910 डॉलर प्रति औंस आहे. (हे वाचा- लवकरच या 600 ट्रेन्समधून प्रवास करता येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता ) चांदीचे नवे दर (Silver Rates) शुक्रवारी सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारत चांदीची किंमत 1595 रुपये प्रति किलोने वाढून 62,972 रुपये झाली आहे. गुरुवारी चांदीचे भाव 61,374 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 24.35 अमेरिकी डॉलर प्रति औंस आहेत. सोन्याचे भाव वाढण्याचे कारण एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सोन्याच्या किंमती का वाढल्या याबाबत दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे सर्वच देशात अनिश्चितता आहे. अनेक युरोपिय देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचांदीच्या दरात तेजी आहे. (हे वाचा- 5% शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन आवश्यक असूनही का होतोय या योजनेत घोटाळा? ) तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूक वाढू शकते. याच कारणामुळे डॉलरमध्ये तेजी देखील येऊ शकते. देशात आजपासून नवरात्रौत्सवर सुरू होत आहे, या काळात स्पॉट गोल्डची मागणी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







