नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : सरकारी कंपनी असणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited)ने शुक्रवारी नॉन-एग्झिक्यूटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी (Non-Executive Employees) मोठी घोषणा केली आहे. कोल इंडियाने या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष 2019-20 साठी परफॉर्मन्स-लिंक्ड रिवॉर्ड (PRL) म्हणून 68,500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीवर 1700 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. कोल इंडियाने एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. 25 ऑक्टोबरआधी कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. कोल इंडियाच्या या PRL मुळे जवळपास 2.62 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये कोल इंडियाच्या 8 सहाय्यक कंपन्यांचे कर्मचारी देखील असतील. कोरोना व्हायरसची परिस्थिती असताना देखील कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पीआरएल मध्ये 5.87 टक्के अर्थात 3800 रुपयांची वाढ केली आहे. ही रक्कम 68,500 रुपये असणार आहे. याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी 2019-20 या वर्षात कमीतकमी 30 वर्किंग डे पूर्ण केले आहेत. (हे वाचा- Gold Price : नवरात्रौत्सवात सोनं खरेदीचा प्लॅन आहे? इथे वाचा सोन्याचे नवे दर) गुरुवारी कोल इंडियाच्या जायंट बायपरटाइट कमिटी कोल इंडस्ट्री (JBCCI-X) द्वारे झारखंडच्या रांचीमध्ये झालल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल इंडिया मॅनेजमेट (CIL Management) आणि केंद्रीय व्यापार संघांचे (Central Trade Union) प्रतिनिधी उपस्थित होते. हा निर्णय घेतल्याबाबत आणि सर्व सदस्यांचे एकमत झाल्याने कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय व्यापार संघाच्या अधिकाऱ्यांची देखील या निर्णयामध्ये साथ मिळाली. (हे वाचा- ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती, आजच उघडा खाते आणि मिळवा बंपर फायदा) सप्टेंबरमध्ये कोल इंडिया लिमिटेडच्या आउटपूट आणि सप्लायमध्ये 32 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्टोबरमध्ये देखील कंपनीची ग्रोथ कायम आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमधील उत्साह वाढेल आणि त्यामुळे आणखी चांगले काम होईल. घरगुती कोळशाच्या 80 टक्के पुरवठा कोल इंडियाकडूनच पूर्ण होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







