नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: तुम्ही जर एसबीआय (State Bank of India News Update) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही काळापासून ऑनलाइन फसवणूक, SMS च्या माध्यमातून फ्रॉड असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहिला नाहीत तर तुमचीही फसवणूक होऊ शकते आणि आयुष्यभराची कमाई तुम्ही गमावून बसाल. सध्या SBI ग्राहकांना या फसवणूक करणाऱ्यांकडून एक मेसेज पाठवला जात आहे. ज्यात असं नमूद करण्यात आलं आहे की तुमचं YONO अकाउंट बंद करण्यात आलं आहे. लक्षात घ्या, हा मेसेज फेक आहे जो तुमची फसवणूक करण्याच्या हेतून पाठवण्यात आला आहे. बँकेकडून ग्राहकांना असा कोणताही मेसेज पाठवण्यात आलेला नाही. पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. काय म्हटलं आहे या मेसेजमध्ये? ग्राहकांना एसबीआयच्या नावे फेक मेसेज पाठवला जात आहे. ज्यात ग्राहकांना त्यांचे योनो अकाउंट ब्लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याकरता पॅन कार्ड अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. शिवाय या फेक मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे ज्यात पॅन क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाते आहे. हे वाचा- तुमच्याकडेही आहे PNB चे हे कार्ड तर मिळेल 2 लाख रुपयांचा फायदा, कसा मिळवाल लाभ? पीआयबीने काय म्हटलं आहे? पीआयबीने ट्वीट करत ग्राहकांना आलेल्या मेसेजचा स्टेट बँक ऑफ इंडियाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असं ट्वीट केलं आहे की, बनावटपणे एसबीआयच्या नावे एक फेक मेसेज पाठवला जात आहे ज्यात ग्राहकाच योनो अकाउंट बंद झाल्याचं म्हटलं आहे. अशाप्रकारे तुमचे बँकिंग डिटेल्स शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल किंवा एसएमएसना प्रतिसाद देऊ नका. तुम्हाला अशाप्रकारचा कोणताही मेसेज आला तर report.phishing@sbi.co.in यावर त्वरित तक्रार करा
A #Fake message impersonating @TheOfficialSBI claims that the recipient's YONO account has been blocked#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 12, 2021
▶️Never respond to emails/SMS asking to share your banking details
▶️If you have received any similar message, report immediately on report.phishing@sbi.co.in pic.twitter.com/SbijbjrjrO
ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या या मेसेजची लिंक पूर्णपणे फेक आहे. त्यावर क्लिक करू नका अन्यथा तुम्ही फसवणुकीची शिकार होऊ शकता. बँकांकडून देखील वेळोवेळी अशा SMS, ईमेल्स, फेक कॉल्सबाबत अलर्ट पाठवला जातो. त्याकडे दूर्लक्ष करणं नुकसान करणारं ठरू शकतं. शिवाय हे देखील लक्षात घ्या YONO Account सुरू करण्यासाठी जर कुणी पैसे मागितले तर ती व्यक्तीही फसवणूक करणारी असेल. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू नका. हे वाचा- Jhunjhunwala यांचा हा शेअर महिनाभरात 58% नी वधारला, तुम्ही केलीये का गुंतवणूक? तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.