मुंबई, 04 जानेवारी: ज्याप्रमाणे 1 जानेवारी 2022 पासून ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ (Bank Charges Inceased) झाली आहे, त्याचप्रमाणे इतरही काही शुल्कात बदल झाला आहे. आता देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आणखी एक झटका मिळाला आहे. 1 फेब्रुवारीपासून आणखी एका शुल्कात वाढ होणार आहे. तुमचेही एसबीआयमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS ट्रान्झॅक्शनसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे, हा 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत असेल.
SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहार करता येणार्या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती.
हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किमतीवरही Omicron चा परिणाम, गोल्ड रेटमध्ये उसळीIMPS म्हणजे काय?
IMPS ला इमिडिएट मोबाइल पेमेंट सर्व्हिस म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सेवा आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी देते. ही सेवा रविवार आणि इतर सुट्ट्यांसह 24 X 7 उपलब्ध आहे.
हे वाचा-HDFC Securities ची 'या' केमिकल स्टॉकवर नजर; 3 महिन्यात 20 टक्के कमाईचा अंदाजएटीएम शुल्कात वाढ
बँक खातं वापरणारे खातेधारक सर्रास पैसे कढण्यासाठी एटीएमचा (ATM rules Changing from 1st January 2022) वापर करतात. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2022 पासून ATM मधून पैसे काढणे महाग झाले आहे. आरबीआयच्या नियमांअंतर्गत आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी (ATM transaction limit) अधिक पैसे मोजावे लागतील. 1 जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी एटीएम चार्जेस 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ठराविक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला दरवेळी 21 रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटी द्यावा लागेल. अगोदर ही रक्कम 20 रुपये होती, ती आजपासून 21 रुपये करण्यात आली आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.