मुंबई, 04 जानेवारी: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट Omicron आता वाणिज्य आणि व्यवसायिक जगावर देखील परिणाम करत आहे. तज्ज्ञांची अशी खात्री आहे की या नव्या व्हेरिएंटचा असा परिणाम होईल की, सोन्याचे दर $1835 (
Omicron Effect on Gold Rate) च्या पातळीवर ढकलले जातील. सध्याच्या पातळीपेक्षा हा दर सुमारे 2% जास्त आहे. वाढलेले निर्बंध, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे परिणाम यामुळे सोन्याच्या मागणीला (
Demand of Gold) आणखी वेग येईल. सोन्याचा भाव (
Gold Rate today) 47,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान जाण्याची विश्लेषकांची अपेक्षा आहे.
MCX वर वाढले सोन्याचे भाव
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 0.18 टक्क्यांच्या वाढीसह सोन्याचा भाव आज 47,800 रुपये प्रति तोळावर आहे. तज्ज्ञांच्या मते, निर्बंध आणि लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास सोन्यामध्ये आणखी मजबूती पाहायला मिळेल. दरम्यान आज चांदी 0.12 टक्क्यांनी घसरून 61,668 रुपये किलो (
Silver Rate Today) वर व्यवहार करत आहे.
हे वाचा-शेअर बाजारात उडी घेण्याचा विचार करताय? वाचा Zerodha संस्थापकांच्या खास टिप्स
राज्यात काय आहे सोन्याची परिस्थिती?
महाराष्ट्रात सोन्याच्या दरात किरकोळ बदल (
Gold Rate in Maharashtra) पाहायला मिळतो आहे. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या चार शहरातील सोन्या-चांदीचे दर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 49260 रुपये | 49250 रुपये |
पुणे | 49070 रुपये | 49080 रुपये |
नाशिक | 49070 रुपये | 49080 रुपये |
नागपूर | 49260 रुपये | 49250 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 47260 रुपये | 47250 रुपये |
पुणे | 46,540 रुपये | 46,550 रुपये |
नाशिक | 46,040 रुपये | 46,050 रुपये |
नागपूर | 47260 रुपये | 47250 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
शहर | आजचा दर (प्रति किलो) | कालचा दर (प्रति किलो) |
मुंबई | 61700 रुपये | 62400 रुपये |
पुणे | 61700 रुपये | 62400 रुपये |
नाशिक | 61700 रुपये | 62400 रुपये |
नागपूर | 61700 रुपये | 62400 रुपये |
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
हे वाचा-इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कशिवाय पेमेंट, RBIची ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी
या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.