Home /News /money /

HDFC Securities ची 'या' केमिकल स्टॉकवर नजर; 3 महिन्यात 20 टक्के कमाईचा अंदाज

HDFC Securities ची 'या' केमिकल स्टॉकवर नजर; 3 महिन्यात 20 टक्के कमाईचा अंदाज

J B Chemicals & Pharmaceuticals ला बाय रेटिंग देणाऱ्या ब्रोकरेज हाऊसचे टार्गेट 1985-2100 रुपये आहे. हे टार्गेट 3 महिन्यांत पूर्ण होईल. HDFC सिक्युरिटीजने या खरेदीसाठी 1600 रुपयांच्या स्टॉपलॉसची शिफारस केली आहे.

    मुंबई, 4 डिसेंबर : एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) नुकत्याच जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सचा स्टॉक ( J B Chemicals & Pharmaceuticals) अलीकडेच डेली चार्टवर मोठ्या प्रमाणात घसरणीच्या ट्रेंडलाइनमधून बाहेर पडताना दिसत आहे. या स्टॉकचा शॉर्ट टर्म ट्रेन्ड सकारात्मक दिसत आहे कारण तो त्याच्या 5 आणि 20 DMA वर ट्रेड करत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने या स्टॉकची टॉप ई-मार्जिन पोझिशनल पिक म्हणून निवड केली आहे. जेबी केमिकल्सला बाय रेटिंग देणाऱ्या ब्रोकरेज हाऊसचे टार्गेट 1985-2100 रुपये आहे. हे टार्गेट 3 महिन्यांत पूर्ण होईल. HDFC सिक्युरिटीजने या खरेदीसाठी 1600 रुपयांच्या स्टॉपलॉसची शिफारस केली आहे. Share Market Investment : यंदाच्या वर्षात या सेक्टरमध्ये बंपर कमाईची संधी, काय आहेत कारणं? वाचा सविस्तर जेबी केमिकल्सची स्थापना 1976 मध्ये झाली. कंपनीचे पूर्ण नाव जे बी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (JBCPL) आहे. ही इंटिग्रेटेड रिसर्च बेस्ड आणि पब्लिक लिस्टेड कंपनी आहे. जी भारतात तसेच सर्व परदेशी बाजारपेठेत व्यवसाय करते. कंपनी जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. निम्म्याहून अधिक उत्पन्न निर्यात व्यवसायातून येते. तुमच्याकडेही असं PAN Card असेल तर भरावा लागेल 10 हजारांचा दंड, वाचा नियम JBCPL विविध प्रकारच्या स्पेशल प्रोडक्ट्सची निर्मिती करते ज्यात विविध प्रकारचे इंजेक्शन, गोळ्या, क्रीम, मलम, हर्बल लिक्विड आणि कॅप्सूल यांचा समावेश होतो. गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने 69 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या 5 वर्षात तो मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे आणि या कालावधीत शेअरने 401 टक्के परतावा दिला आहे. 5 वर्षांपूर्वी हा शेअर 348 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 1746 रुपयांच्या आसपास दिसत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या