मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI ALERT! तुम्ही एखादं App अशाप्रकारे डाउनलोड करत असाल तर सावधान, बँक खातं होईल रिकामं

SBI ALERT! तुम्ही एखादं App अशाप्रकारे डाउनलोड करत असाल तर सावधान, बँक खातं होईल रिकामं

SBI Alert: देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) वेळोवेळी ग्राहकांना अलर्ट पाठवले जातात. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने आणखी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली, 06 जुलै: देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) वेळोवेळी ग्राहकांना अलर्ट पाठवले जातात. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने आणखी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. SBI ने एक ट्वीट करत ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स ग्राहकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात, बँकिंग व्यवहार करताना आचरणात आणणं गरजेचं आहे. अन्यथा आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो. काही वेळा एखाद्या चुकीच्या सोअर्सवरून डाऊनलोड केलंलं अॅप देखील धोकादायक ठरू शकतं.

एसबीआयने काय केलं ट्वीट?

SBI ने केलेल्या या लेटेस्ट ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'आम्ही ग्राहकांना सल्ला देतो की फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा आणि कोणतीही संवेदनशील माहिती ऑनलाइन शेअर करू नका, एखाद्या अनोळखी स्रोतावरुन कोणतं App देखील डाऊनलोड करू नका'.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँकेने काय दिल्या टिप्स?

-जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. बाबी कुठेही शेअर करू नका

हे वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, DA सह सरकारने केल्या आहेत या 5 घोषणा

-एसबीआय, आरबीआय, सरकारी कार्यालय, पोलीस केवायसी इ. संबंधित अधिकारी म्हणून कॉल करणाऱ्यांपासून सावध राहा.

-एखादा कॉल किंवा इमेलद्वारे समजलेल्या अनोळखी स्रोतावरून मोबाइल अॅप डाउनलोड करू नका

-अनोळखी स्रोतावरून आलेल्या मेलमधील Attachments वर क्लिक करू नका

First published:
top videos

    Tags: SBI, Sbi account, Sbi alert, SBI bank, Tech news, Technology