नवी दिल्ली, 03 जुलै: 1.12 कोटी केंद्रीय कर्मचारी (Government Employees) आणि पेन्शनर्सना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांचा फायदा 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख केंद्र सरकारचे पेन्शनधारक यांना होईल. या घोषणांमध्ये महागाई भत्ता (DA),डीआर (DR) इ. महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे. 1. डीए आणि डीआर- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांना राज्यसभेत अशी माहिती दिली होती की जुलैपासून सातव्या आयोगातील शिफारशींनुसार डीए आणि डीआर मिळण्यास सुरुवात होईल. दरम्यान अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नॅशनल काउंसिल ऑफ सेसीएमने असा दावा केला आहे की सप्टेंबर महिन्यात पगारात डीए आणि डीआर मिळू शकतो 2. हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA)- सरकारकडून एचबीए संदर्भात नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने एचबीए व्याजदर 7.9 टक्के केला होता, 31 मार्च 2022 पर्यंत हाच दर लागू राहणार आहे. हे वाचा- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA मिळण्याआधी मिळाला हा दिलासा 3. प्रवास भत्ता (TA)- निवृत्त कर्मचाऱ्यांना आता 180 दिवसांपर्यंत टीएचा तपशील जमा करावा लागेल. आधी ही मर्यादा 60 दिवसांची होती. हा नियम 15 जूनपासून लागू करण्यात आला आहे. 4. ईमेल, WhatsApp आणि एसएमएसच्या माध्यमातून मिळे पेन्शन स्लीप- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पेन्शन स्लीपकरता बँकांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना म्हटले आहे की त्यांनी पेन्शनर्सना पेन्शन स्लीप त्याचा ईमेल, व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसच्या माध्यमातून पाठवू शकतात. हा नियम 1 जुलैपासून लागू झाला आहे. हे वाचा- बँकेत FD करणाऱ्यांनी लक्ष द्या! RBI ने बदलला Fixed Deposite बाबतचा नियम 5.पेन्शन संदर्भात दिलासा- सरकारने जारी केलेल्या फॅमिली पेन्शनच्या नवीन नियमांनुसार आता मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच पेन्शनची सुविधा सुरू होईल. त्यानंतर आवश्यक औपचारिकता पूर्ण करता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.