जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तर ऐका SBI चा हा सल्ला, अन्यथा होईल खाते रिकामे

पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तर ऐका SBI चा हा सल्ला, अन्यथा होईल खाते रिकामे

पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तर ऐका SBI चा हा सल्ला, अन्यथा होईल खाते रिकामे

एसबीआने त्यांच्या खातेधारकांना अशी माहिती दिली आहे की, कोरोना काळात डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे याचा फायदा सायबर हल्लेखोर घेत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जुलै : भारतीय स्टेट बँकने (State Bank of India) ने त्यांच्या 42 कोटी खातेधारकांना अलर्ट केले आहे. एसबीआने त्यांच्या खातेधारकांना अशी माहिती दिली आहे की, कोरोना काळात डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे याचा फायदा सायबर हल्लेखोर घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. अशावेळी एसबीआय त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावधान राहण्याचा इशारा देत आहे. जर तुमचे देखील या बँकेत खाते असेल तर SBI ने दिलेल्या काही टिप्सचा फायदा घेऊन तुम्ही देखील तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. एसबीआयने ट्वीट करून ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. एसबीआयने या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टर नेहमी सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर आहे. जर तुम्हाला असे फ्रॉड कॉल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज येत असतील, ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्यासाठी सांगण्यात येईल किंवा तात्काळ पैसे देण्याची मागणी केली जाईल. (हे वाचा- 1,41,66,26,55,00,000! Amazon संस्थापकांच्या संपत्तीचा आकडा मोजताना होईल दमछाक ) जर तुमच्या बँक खात्यामध्ये असा कोणताही व्यवहार झाला आहे, जो तुम्ही नाही केली आहे किंवा तुम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग डिटेल्स शेअर केले आहेत किंवा तुम्हा कोणत्या सायबर हल्ल्याचे शिकार झाले आहात तर याची सूचना स्थानिक पोलीस आणि सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ यांना देऊ शकता. याप्रकरणी लगेच रिपोर्ट करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे जेणेकरून सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करता येईल.

जाहिरात

त्याचप्रमाणे एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना बँकिंग व्यवहारांसाठी स्ट्राँग पासवर्ड बनवण्याच सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे हा पासवर्ड वेळोवेळी बदलणे गरजेचे असल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पासवर्ड तुमच्या आप्तेष्टांचं नाव नसावं, अन्यथा त्यांचे खाते देखील धोक्यात येऊ शकेल. याप्रकारच्या पासवर्डचा अंदाज बांधणे हॅकर्ससाठी सोपे असते. (हे वाचा- मोठी बातमी! या बँका आणि कंपन्यामधील भागीदारी विकण्याच्या तयारीत सरकार )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात