मराठी बातम्या /बातम्या /मनी /

1,41,66,26,55,00,000 रुपये! Amazon संस्थापकांच्या संपत्तीचा आकडा मोजताना होईल दमछाक, रचला नवा रेकॉर्ड

1,41,66,26,55,00,000 रुपये! Amazon संस्थापकांच्या संपत्तीचा आकडा मोजताना होईल दमछाक, रचला नवा रेकॉर्ड

अ‍ॅमेझॉन (Amazon) चे संस्थापक जेफे बेजोस (Jeff Bezos) यांच्या नेटवर्थमध्ये एका दिवसात 13 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 जुलै : अ‍ॅमेझॉन (Amazon) चे संस्थापक जेफे बेजोस (Jeff Bezos) जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.  दरम्यान सोमवारी जेफ यांच्या नावे आणखी एक नवा रेकॉर्ड झाला आहे. जेफ बेजोस यांच्या नेटवर्थमध्ये एका दिवसात 13 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स 2012 मध्ये बनवण्यात आले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात एखाद्या व्यक्तीच्या नेटवर्थमध्ये एवढी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढल्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या शेअर्समध्ये 7.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2018 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. 56 वर्षीय जेफ बेजोस यांची संपत्ती यावर्षी 2020 मध्ये 74 अब्ज डॉलरने वाढून 189.3 अब्ज डॉलर झाली आहे. भारतीय चलनाप्रमाणे ही किंमत साधारण 1,41,66,26,55,00,000 रुपये इतकी आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत बिकट अशी आर्थिक परिस्थिती आहे. अशावेळी त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली वाढ रेकॉर्ड ब्रेकिंग आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! या बँका आणि कंपन्यामधील भागीदारी विकण्याच्या तयारीत सरकार)

Exxon Mobil Corp., Nike Inc. आणि McDonald’s Corp.यांसारख्या कंपन्यांच्या मुल्यांपेक्षाही जेफ बेजोस यांची वैयक्तिक संपत्ती जास्त आहे. त्यांची पूर्वपत्नी मॅकेन्झी बेजोस यांच्या संपत्तीत देखील सोमवारी 4.6 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. परिणामी त्या आता जगातील 13व्या श्रीमंत व्यक्ती बनल्या आहेत.

(हे वाचा-आता प्रिंट, TV, डिजिटल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या जाहिरांतींवर ठेवले जाणार लक्ष)

दरम्यान कोरोना व्हायरसच्या संकटकाळात अनेक टेक कंपन्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत यावर्षी 15 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

First published: