नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: अनेकदा एखादा बडा गुंतवणूकदार कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत आहे, याचा अभ्यास करून किरकोळ गुंतवणूकदार मार्केटमध्ये (Investing in Share Market) पैसा गुंतवत असतात. अनुभवी गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ तपासण्यासाठी तिमाहीच्या शेवटचा हंगाम चांगला असतो. कारण प्रत्येक तिमाहीच्या शेवटी कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डिंगचा नमुना पब्लिक डोमेनमध्ये सांगतात. यामध्ये कंपन्या त्या मोठ्या गुंतवणूकदारांची नावे आणि त्यांच्या कंपनीत कुणी जास्त शेअर्स घेतले आहेत किंवा कमी केले आहेत याबाबत माहिती देतात. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातोय याचा मागोवा घेणे यामुळे सोपे होते.
ही बातमी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आहे. अनुभवी गुंतवणूकदार सचिन बन्सल (Sachin Bansal Portfolio) यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत सांघी इंडस्ट्रीजमध्ये 2.03 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. सचिन बन्सल यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट झालेला हा नवा स्टॉक शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी (Multibagger Stock Investment) आहे.
वाचा-ऐन सणासुदीला भाजीपाल्याबरोबर कांदाही रडवणार! महिन्याभरात दुप्पट झाले भाव
सप्टेंबर तिमाहीसाठी सांघी इंडस्ट्रीजच्या (Sanghi Industries Share Price) शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सचिन बन्सल यांनी या कालावधीत कंपनीमध्ये 51 लाख शेअर्स अर्थात एकूण 2.03 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. आता जर आपण जून तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर जून तिमाहीत सांघी इंडस्ट्रीमध्ये सचिन बन्सल यांचा हिस्सा शून्य होता. याचा अर्थ सचिन बन्सल यांनी सप्टेंबर तिमाहीतच कंपनीत 2.03 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र हे निश्चितपणे सांगता येत नाही की त्यांनी ही खरेदी हप्त्यांमध्ये केली आहे की एकरकमी.
सचिन बन्सल यांच्याप्रमाणे, आणखी एक अनुभवी गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल (Mukul Mahavir Agrawal Portfolio) यांनीही जुलै-सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत या कंपनीमध्ये 33,64,603 शेअर्स अर्थात 1.34 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.
वाचा-IRCTC च्या शेअरमध्ये दुसऱ्या दिवशीही 18 टक्क्यांनी घसरण
जर सांघी इंडस्ट्रीजच्या शेअर किमतीचा इतिहास पाहिला तर गेल्या 66 महिन्यांत हा शेअर 41.65 रुपये प्रति शेअर वरून 70 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत, त्याने आपल्या भागधारकांना सुमारे 70 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या एका वर्षात या शेअरने 23.75 रुपयांवरून 70 रुपये प्रति शेअरची तेजी पाहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market