नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : देशातील सर्वसामान्य जनता टोमॅटोच्या (Tomato Rate) महागाईने आधीच त्रस्त असताना, आता कांद्याचे भावही लोकांना रडवणार असं दिसत आहे. गेल्या एका महिन्यात घाऊक बाजारात कांद्याचे (Onion Rate Hike) भाव दुप्पट झाले आहेत. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, यावेळी सणासुदीत कांदा महाग राहील आणि जानेवारीच्या मध्यापर्यंतही दरवाढीमध्ये फारसा दिलासा मिळणार नाही.
देशातील अनेक कांदा (Onion) उत्पादक भागात मुसळधार पावसामुळं कांद्याच्या उन्हाळी पिकाचं मोठं नुकसान झालं असून हिवाळी पिकाची पेरणी लांबणीवर पडली आहे. दरम्यान, टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, कोलकातामध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो सर्वाधिक 93 रुपये किलोवर पोहोचला आहे.
सतत वाढत्या किंमती
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील प्रमुख उत्पादक क्षेत्र असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये एका महिन्यात कांद्याची घाऊक किंमत जवळपास दुप्पट होऊन 33,400 रुपये प्रति टन झाली आहे. मुंबईत कांद्याची किरकोळ किंमतही 50 रुपये किलो झाली आहे. कांद्याची निर्यात अजूनही खुली आहे, पण जर किंमती अशाच वाढत राहिल्या तर सरकार पुन्हा निर्यातीवर बंदी घालू शकते.
हे वाचा - Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल भाव
विशेष म्हणजे कांद्याची किंमत हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. दरवर्षी कांद्याची किंमत काही महिन्यांसाठी या कारणांमुळं विक्रमी उच्चांक गाठते आणि या वर्षी पुन्हा भाव चढत्या दिशेनं जात आहेत.
पिकाचे मोठे नुकसान
हे वाचा - विजेचा शॉक देत पत्नीची केली भयंकर अवस्था; दुसऱ्या बायकोच्या मदतीनं नवऱ्यानं गाठला क्रूरतेचा कळस
तज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी कांदा उत्पादक भागात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे पिकाचे खूप नुकसान झाले आहे आणि त्यात अनेक रोग देखील आले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा 268 टक्के जास्त पाऊस झाला आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, यावेळी सणासुदीत कांदा महाग राहील आणि जानेवारीच्या मध्यापूर्वी दिलासा अपेक्षित नाही. जानेवारीमध्ये नवीन पीक आल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांद्याचे घाऊक भाव -
दिनांक | जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|---|
20/10/2021 | अहमदनगर | उन्हाळी | क्विंटल | 1503 | 200 | 3800 | 3150 |
20/10/2021 | जळगाव | लाल | क्विंटल | 25 | 2500 | 2500 | 2500 |
20/10/2021 | मंबई | --- | क्विंटल | 10904 | 2500 | 3700 | 3100 |
20/10/2021 | नागपूर | लाल | क्विंटल | 1200 | 2500 | 3500 | 3250 |
20/10/2021 | नागपूर | पांढरा | क्विंटल | 1000 | 2500 | 3500 | 3250 |
20/10/2021 | नाशिक | उन्हाळी | क्विंटल | 42010 | 764 | 3307 | 2557 |
20/10/2021 | पुणे | --- | क्विंटल | 1000 | 2000 | 3500 | 3000 |
20/10/2021 | पुणे | लोकल | क्विंटल | 13887 | 1950 | 3250 | 2600 |
20/10/2021 | सातारा | --- | क्विंटल | 86 | 1500 | 3500 | 2500 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 71615 |
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Onion, Priceonion