नवी दिल्ली, 24 जून : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पगारात यावर्षी कोणतीही वाढ झाली नाही आहे. त्यांचा वार्षिक पगार गेल्या 12 वर्षांपासून 15 कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited RIL) चे चेअरमन आणि एमडी असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात आलेल्या मोठ्या संकटामुळे या आर्थिक वर्षात पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी 2008-09 पासून पगार, भत्ता आणि कमिशन मिळून त्यांचे मानधन वार्षिक 15 कोटींवर स्थिर ठेवले आहे.
मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत वार्षिक 24 कोटी रुपये सोडले आहेत. कंपनीने त्यांच्या 2019-20 साठी जारी केलेल्या वार्षिक अहवालामध्ये असे सांगितले आहे की, कोव्हिड-19 पँडेमिकमुळे देशावर व्यापक स्वरूपात सामाजिक आणि आर्थिक परिणाम झाला आहे. त्यामुळे हे लक्षात घेता मुकेश अंबानी यांनी त्यांचा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
(हे वाचा-
Mutual Funds मध्ये गुंतवणूक केल्यास 15 वर्षात मिळतील 2 कोटी? वाचा सविस्तर)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी एप्रिल 2020 च्या शेवटी पगार सोडण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक वर्ष 2019-20 साठी मुकेश अंबानी यांना मिळालेल्या मानधनामध्ये 4.36 कोटींचा पगार आणि अलाउन्सचा समावेश आहे.
(हे वाचा-
1 जुलैपासून बदलणार बँक खात्याशी संबधित हे नियम, माहित नसल्यास होईल मोठे नुकसान
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये त्यांना 4.45 कोटी रुपये पगार आणि अलाउन्स मिळाला होता. मुकेश अंबानी यांची कमिशन रक्कम 2019-20 साठी 9.53 कोटी रुपये इतके होते. त्यांनी रिटायरमेंट बेनिफिटच्या स्वरूपात 71 लाख रुपये मिळाले. कंपनीच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांनी असा निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत त्यांची कंपनी आणि बाकी व्यवहार पूर्णपणे आपल्य क्षमतेने काम सुरू करत नाही तोपर्यंत ते पगार घेणार नाहीत
(हे वाचा-
पॅन-आधार लिंक करण्यासाठी केवळ 8 दिवस शिल्लक, अन्यथा असा बसेल आर्थिक फटका)
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.