Home /News /money /

Mutual Funds मध्ये गुंतवणूक केल्यास 15 वर्षात मिळतील 2 कोटी? वाचा सविस्तर

Mutual Funds मध्ये गुंतवणूक केल्यास 15 वर्षात मिळतील 2 कोटी? वाचा सविस्तर

म्युच्यूअल फंड्समध्ये (Best Mutual Funds Return in India) पैसे गुंतवून कोट्यधीश होता येतं का? असा सवाल अनेकदा अर्थतज्ज्ञांना विचारला जातो. यावर त्याचे उत्तर हो असते. मात्र त्यामध्ये देखील काही अटी लागू आहेत.

    नवी दिल्ली, 24 जून :  म्युच्यूअल फंड्समध्ये (Best Mutual Funds Return in India) पैसे गुंतवून कोट्यधीश होता येतं का? असा सवाल अनेकदा अर्थतज्ज्ञांना विचारला जातो. यावर त्याचे उत्तर हो असते. मात्र त्यामध्ये देखील काही अटी लागू आहेत. दीर्घ कालावधीमध्ये मोठी रक्कम मिळवण्यासाठी इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये ((Equity Mutual Funds) थोडी-थोडी रक्कम जमा करून मोठी रक्कम मिळवणे एक चांगला पर्याय आहे. यामध्ये एक चांगला रिटर्न देण्याची क्षमता आहे.  मात्र यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना सतत गुंतवणूक करणे आवश्यक आहे, भले बाजारातील परिस्थिती कशीही असेल. मॉर्निंगस्टार इंडियाने दिलेल्या सर्व आकड्यानुसार सर्व इक्विटी स्कीम कॅटेगरी, इक्विटीशी संबंधित बचत योजना, मिडकॅप, लार्ज-कॅप, स्मॉल-कॅप आणि मल्टि-कॅपने 25 मार्च ते 3 जूनदरम्यान 23 ते 25 टक्के रिटर्न दिला आहे. (हे वाचा-1 जुलैपासून बदलणार बँक खात्याशी संबधित हे नियम, माहित नसल्यास होईल मोठे नुकसान) सर्वात जास्त रिटर्न लार्ज कॅपने दिला आहे. या फंडने 25.1 टक्केपर्यंत रिटर्न दिला आहे. मल्टि-कॅप फंडने 25 टक्के, ELSS आणि लार्ज कॅपने 24.9-24.9 टक्के, स्मॉल कॅपने 24 टक्के, मिड कॅपने 23.2 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान बाजारात 25 ते 30 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. कसे मिळतील 15 वर्षात 2 कोटी? तज्ज्ञाच्या मते जर म्युच्यूअल फंडमध्ये वार्षिक 12 टक्के रिटर्न मिळत असेल तर 15 वर्षामध्ये 2 कोटी रुपये जमा करण्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी जवळपास 39,650 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे एवढी रक्कम नसेल, त्या रकमेपासून सुरुवात करू शकता. तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा पगार वाढण्याबरोबरच तुम्ही गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. (हे वाचा-90 दिवसांनतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा? नागरी उड्डाण मंत्र्यांचे संकेत) म्युच्यूअल फंड्सच्या जाणकारांचे असे म्हणणे आहे की, एसआयपी पैसे कमावण्यासाठी सोपा मार्ग आहे. सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून थोडी-थोडी गुंतवणूक करणे मोठा फंड कमवता येईल. जाणकारांचे असे म्हणणे आहे की, बाजारामध्ये घसरण झाल्यास हे एसआयपी भरण्यामध्ये दिरंगाई करू नका कारण गुंतवणूकदारांना वाढणाऱ्या बाजारात स्वस्त झालेल्या युनिट्सचा लाभ मिळू शकतो. इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये जोखीम घेणारे जास्त गुंतवणूक करू शकतात. लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक अधिक पसंतीची आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Mutual fund

    पुढील बातम्या