Home /News /money /

1 जुलैपासून बदलणार बँक खात्याशी संबधित हे नियम, माहित नसल्यास होईल मोठे नुकसान

1 जुलैपासून बदलणार बँक खात्याशी संबधित हे नियम, माहित नसल्यास होईल मोठे नुकसान

पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध बँकांचे काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे नियम माहित नसताना केलेली छोटीशी चूक तुमच्या खिशावर परिणाम करणारी ठरू शकते.

    नवी दिल्ली, 24 जून : पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध बँकांचे काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे नियम माहित नसताना केलेली छोटीशी चूक तुमच्या खिशावर परिणाम करणारी ठरू शकते. यामध्ये पीएनबी बँकेचे बचत खात्यावरील व्याजदर कमी होणार, एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम तर खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवण्यासंदर्भातील नियम यामध्ये महत्त्वाचेबदल होणार आहेत. PNBच्या बचत खात्यावरील व्याज कमी होणार पंजाब नॅशनल बँक (PNB)ने बचत खात्यावरील (Saving Account)मिळणाऱ्या व्याजदरामध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. एक जुलैपासून पीएनबीच्या बचत खातेधारकांना वार्षिक केवळ 3.25 टक्के व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यामधअये 50 लाख रुपयांपर्यंतचा बॅलन्स असेल तर वार्षिक 3 टक्के तर 50 लाखापेक्षा जास्त बॅलन्स असेल तर 3.25 टक्के व्याज मिळते. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात वर्क फ्रॉम होम पडेल महागात! द्यावा लागणार जास्त Income Tax) याआधी देशातील मोठ्या बँकांपैकी एसबीआय आणि कोटक महिंद्रा या बँकानी देखील व्याजदरामध्ये कपात केली आहे. 1 जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा नियम लॉकडाऊनमुळे एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. 1 जुलैपासून तुमच्या खिशावरील भार वाढू शकतो. एटीएममधून पैसे काढणे 1 तारखेपासून महाग होणार आहे. अर्थ मंत्रालयाने एटीएममधून पैसे काढण्याठी सर्व ट्रान्झॅक्शन शूल्क हटवण्यात आले होते. कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भार येऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला होता. 3 महिन्यासाठी देण्यात आलेली ही सूट 30 जून 2020 रोजी संपत आहे. कमीतकमी बँलन्ससंदर्भात हा नियम बदलणार कोरोना काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी अशी घोषणा केली होती की, तुमच्या खात्यामध्ये निश्चित कमीतकमी बॅलन्स ठेवणे अनिवार्य नसेल. एप्रिल ते जून या महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कमीतकमी शिल्लक नसल्यास दंड आकारण्यात येणार नव्हता. मात्र आता ही सूट 30 जून रोजी संपणार आहे. (हे वाचा-ATM मधून पैसे काढण्यासाठी येणार 5000 रुपयांची मर्यादा, RBI ने आखला नवा प्लॅन) संपादन  - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: ATM transactions, Pnb bank

    पुढील बातम्या