मराठी बातम्या /बातम्या /मनी /देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? काय आहे त्यांचा बिझनेस? नेटवर्थ पाहून व्हाल थक्क!

देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? काय आहे त्यांचा बिझनेस? नेटवर्थ पाहून व्हाल थक्क!

देशातील श्रीमंत महिला रोशनी नादर

देशातील श्रीमंत महिला रोशनी नादर

Roshani Nadar Malhotra: रोशनी नादर मल्होत्रा ​​या लिस्टेड IT कंपनीच्या प्रमुख असलेल्या देशातील पहिल्या महिला आहेत. त्या कम्युनिकेशन स्टडीजमध्ये पदवीधर आहे आणि त्यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च: एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा ​​या 84,330 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. रोशनी नादर ही भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी चालवतात. ज्याची मार्केट व्हॅल्यू 3 लाख कोटी रुपये आहे. एचसीएलची स्थापना त्यांचे वडील शिव नाडर यांनी 1976 मध्ये केली होती. बिझनेसवुमन असण्यासोबतच त्या शास्त्रीय संगीतातही निपुण आहेत. त्यांनी नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून बॅचलर डिग्री मिळवली. विशेष म्हणजे, त्यांचे पदवी शिक्षण कम्युनिकेशन फिल्डमध्ये आहे, यामध्ये त्यांनी प्रामुख्याने रेडिओ, टीव्ही आणि चित्रपटांबद्दल शिक्षण घेतलंय.

आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडता याव्यात यासाठी त्यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवीही मिळवली आहे. त्या शिव नाडर फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत आणि त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयेही बांधली आहेत. 2020 मध्ये फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी 55 व्या स्थानावर होती. लिस्टेड IT कंपनीची कमान सांभाळणाऱ्या रोशनी नादर या भारतातील पहिल्या महिला आहेत.

53 व्या वर्षी महिलेने सुरु केला बिझनेस, आज कमावते लाखो रुपये!

करतात टीव्ही शोची निर्मिती

त्याच्या खांद्यावर एचसीएलची जबाबदारी आहे. तरी देखील त्यांची सिनेमाशी असलेली ओढ कमी झालेली नाही. त्या एक वाइल्ड लाइफ कंजर्व्हेशनिस्ट आहेत आणि त्यांनी या विषयावर The Brink for Animal Planet and Discovery या विषयावर टीव्ही मालिका तयार केली आहे. 2022 मध्ये वटवाघुळावर केलेल्या एका एपिसोडला नॅशनल फिल्म अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्यांनी हलका नावाचा बालचित्रपटही तयार केला आहे.

असं आहे वैयक्तिक आयुष्य

रोशनी नादर मल्होत्राच्या पतीचे नाव शिखर मल्होत्रा ​​आहे. ते एचसीएल हेल्थचे व्हाइस-चेअरपर्सन आहेत. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले. रोशनी आणि शिखर यांना 2 मुले आहेत. एकाचे नाव अरमान (जन्म 2013) आणि दुसऱ्या मुलाचे नाव जहान (2017) आहे. रोशनी नाडरचे शालेय शिक्षण दिल्लीच्या वसंत व्हॅली स्कूलमधून पूर्ण झाले. रोशनी एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या डीनच्या अॅडवायजरी काउंसिलच्या सदस्य आहे. रोशनी ही शिव नाडर आणि किरण नाडर यांची एकुलती एक अपत्य आहे. रोशनीने भारतात आणि परदेशात अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

'या' 5 देशांना अजुनही आहे रेल्वेची प्रतीक्षा, श्रीमंत देशांचाही लिस्टमध्ये आहे समावेश!

First published:
top videos

    Tags: Business, Business News