शिखा श्रेया, रांची: मनात इच्छा असेल तर मग कोणतंही काम पूर्ण करता येतं. यामध्ये मग वय आड येत नाही. झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहणाऱ्या शालिनी जैन यांची कहानी देखील अशीच आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे पतीची देखरेख आणि मुलांच्या संगोपनात घालवले. मात्र त्यांच्या मनात नेहमीच काही तरी करुन दाखवायची इच्छा होती. आजच्या या युगात जिथे लोक या वयात आपली जबाबदारी पार पाडून विश्रांती घेण्याचा विचार करतात, तिथे शालिनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केलीये.
इंजिनिअरची नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरु केले मशरूम उत्पादन! आता करतो लाखोंची कमाईन्यूज 18 लोकलशी बोलताना शालिनी जैन म्हणाल्या की, नेहमीपासूनच ‘स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते. पण, लवकर लग्न झाल्यामुळे ही स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. सासरी आल्यावर एकत्र कुटुंब होतं, सगळी जबाबदारी माझ्यावर होती. सासूही टोमणे मारायची की, सुनेने घर सांभाळावे, काम करण्याची काय गरज आहे. पण जेव्हा तुम्ही मुले मोठी झालीत, तेव्हा पुन्हा एकदा मी माझे स्वप्न जगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि स्वतःच्या हातांनी सुंदर डिझायनर पिशव्या शिवण्यास सुरुवात केली.
एकेकाळी मसाल्यांच्या फॅक्ट्रीत केलं काम, कोरोनात नोकरी गमावताच पठ्ठ्याने उभारला स्वतःचा मसाला ब्रँड!B.Sc ऑनर्स दरम्यान भरतकामाचा छंद
शालिनी सांगतात, ‘मी कोलकाता येथील जीडी बिर्ला कॉलेजमधून बीएससी ऑनर्स केले आहे.तेव्हापासून मला भरतकामाची खूप आवड होती. कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत मी स्वतःच्या हाताने एकापेक्षा जास्त बॅग किंवा शोपीस तयार करायचे. त्याचवेळी मला वाटलं होतं की मी माझं करिअर यातच करेन. पण ते होऊ शकलं नाही. आता कुठे दोन्ही मुलं सेटल झाले. यामुळे आता मी निश्चिंत होऊन काम करु शकतेय. मी आता भरतकामातच माझा व्यवसाय सुरु केलाय. यामध्ये मी बॅग एंब्रोइड्रीचं काम, लड्डू गोपालच्या कपड्यांमध्ये एंब्रोइड्रीचं काम, लग्नासाठी डिझाइनचे लिफाफे, घर सजवण्याचे काचेने तयार केलेले शोपीस तयार करते. लोकांना हे खूप पसंत पडतेय.’
आज आमच्यासोबत 10 महिला
शालिनी सांगतात, ‘आज 10 महिला आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत, त्या घरात राहून आम्ही दिलेल्या ऑर्डर पूर्ण करुन देतात. जसे की पॅकिंग, भरतकाम, विणकाम. व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्या पतीने मला पाठिंबा दिला, परंतु यासोबतच मी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचे कर्जही घेतले होते, त्यामुळे व्यवसाय सुरू करणे सोपे झाले. आज आमचे उत्पादन संपूर्ण भारतातील शहरांमध्ये जाते.आम्ही ऑनलाइन डिलीव्हरी करतो. तमिळनाडू, चेन्नई, गुजरात, महाराष्ट्रात अशा उत्पादनांना जास्त मागणी आहे. यासोबतच मी प्रदर्शने, खादी मेळावे आणि इतर यात्रांमध्ये स्टॉल लावते. ज्या अंतर्गत अनेक ऑर्डर्स देखील येतात.’ तुम्हालाही शालिनीचे हाताने बनवलेले पदार्थ तुमच्या घरी ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही 9308583604 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.