जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊन 3.0 मध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता! आणखी तीन महिने मिळणार EMI वर सूट?

लॉकडाऊन 3.0 मध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता! आणखी तीन महिने मिळणार EMI वर सूट?

लॉकडाऊन 3.0 मध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता! आणखी तीन महिने मिळणार EMI वर सूट?

आरबीआय आणखी तीन महिन्यासाठी सर्व प्रकारच्या कर्जाचे ईएमआय स्थगित करण्याचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 मे : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करण्यासाठी भारतात केंद्र आणि राज्य सरकारचे विविध प्रयत्न सुरू आहेत. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्याची सर्वात जास्त गरज लॉकडाऊनच्या या काळात आहे. अशा परिस्थितीत आरबीआयने EMI संदर्भात काही घोषणा केल्या आहेत तर बँकांना काही सल्ले देखील दिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्येच आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरटोरियम लागू केला आहे.  यामुळे बँकाना आरबीआयने वाहन, गृह किंवा इतर मुदत कर्जांचा ईएमआय 3 महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी दिली होती आणि यामुळे ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर देखील खराब होणार नाही. आरबीआयच्या सूचनेचं पालन करत अनेक महत्त्वाच्या बँकांनी ग्राहकांना तीन महिन्याच्या ईएमआयसाठी सूट दिली होती. (हे वाचा- 30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार मोठी मदत करण्याची शक्यता ) दरम्यान आरबीआयकडून देण्यात आलेली ही स्थगितीची परवानगी आणखी तीन महिन्यासाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात RBIकडून याबाबत निर्णय येऊ शकतो. सामान्यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय हा निर्णय घेऊ शकते. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सर्व बँकांच्या प्रमुखांनी हा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कॅशफ्लो वाढू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये जो मोरटोरियम घोषित करण्यात आला होता त्यानुसार तीन महिन्यासाठी कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यात आले होते. सर्व वाणिज्य बँका- Commercial Banks (प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) यांना ईएमआय स्थगिती देण्यास परवानगी देण्यात आली होती. ग्राहकांना याकरता अर्ज करण्याची गरज नव्हती, असं स्पष्टीकरण एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिलं होतं. (हे वाचा- मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवली ) RBI च्या पॉलिसीमध्ये मुदत कर्जांच्या स्पष्ट उल्लेख आहे. ज्यात गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे, वाहन आणि ज्यामध्ये मुदतीचा कालावधी आहे अशा कोणत्याही कर्जांचा समावेश आहे. यात मोबाईल, फ्रीज, टीव्ही इ. वरील ईएमआयचाही समावेश आहे. आता हा निर्णय झाल्यास आणखी तीन महिन्यासाठी ईएमआय पुढे ढकलला जाऊ शकतो. परिणामी सामान्यांना या कठीण प्रसंगात मोठा दिलासा मिळेल. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात