नवी दिल्ली, 06 मे : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क प्रति लीटर 10 आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लीटर 13 रुपये असणार आहे. यानुसार पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लीटर 8 रुपये रोड सेस आकारण्यात येणार आहे. तर विशेष अतिरिक्त शुल्काच्या स्वरूपात पेट्रोलवर प्रति लीटर 2 रुपये आणि डिझेलवर प्रति लीटर 5 रुपये आकारण्यात येतील. आज 6 मे 2020 पासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होत आहेत. वाढवण्यात आलेले उत्पादन शूल्क तेल कंपन्यांकडून आकारण्यात येणार आहे. तसंच पेट्रोल पंपावर इंधनाच्या किरकोळ विक्रीवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे या उत्पादन शुल्क वाढीचा तुमच्या खिशावर परिणाम होणार नाही आहे.
(हे वाचा-चीनला मोठा झटका, भारताला विश्व गुरू बनवण्यासाठी पंतप्रधानांचा प्लॅन तयार)
गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. कोरोना व्हायरसमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये पडझड सुरूच आहे. दरम्यान केंद्राच्या महसुलात वाढ करण्यासाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे. CNBC-TV18 ला सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांवर हे शुल्क आकारण्यात येईल. पेट्रोल डिझेलची एमआरपी आहे तीच राहणार असल्याची माहिती तेल कंपन्यांकडून देण्यात आली आहे.
(हे वाचा-घर घेण्याचं स्वप्न लॉकडाऊन नंतर होईल पूर्ण,वाचा फ्लॅट्स स्वस्त होण्याची कारणं)
5 मे रोजी आम आदमी पार्टी सरकारने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलवरील value-added tax (VAT) वाढवला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलवरील व्हॅट प्रति लीटर 1.67 रुपये तर डिझेलवरील व्हॅट 7.10 रुपये प्रति लीटर वाढवण्यात आला आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 71.26 प्रति लीटर आहे तर डिझेल 69.39 रुपये प्रति लीटर आहे.
संपादन - जान्हवी भाटकर
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.