30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार 'ही' मदत करण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहेत फायदे

30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार 'ही' मदत करण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहेत फायदे

कमी पगार असणाऱ्यांना कर्मचाऱ्याना मेडिकल आणि कॅश बेनिफिट मिळावेत याकरता सरकार ESIC अंतर्गत कव्हरेजची मर्यादा वाढवू शकते. यामध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 मे : कोरोना व्हायरस संक्रमणामध्ये लोकांना आर्थिक मदत व्हावी याकरता सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये सरकारने आता ईएसआयसी (ESIC) योजनेची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. CNBC आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कमी पगार असणाऱ्यांना जास्तीत जास्त कर्मचाऱ्याना मेडिकल आणि कॅश बेनिफिट मिळावेत याकरता सरकार ESIC अंतर्गत कव्हरेजची मर्यादा वाढवू शकते. यामध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाने ही कव्हरेजची सीमा वाढवण्यात यावी असा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने दिलेल्या या प्रस्तावानुसार ESIC चा लाभ मिळणाऱ्या कर्मच्याऱ्यांच्या पगाराची मर्यादा 21 हजाराहून वाढून 30 हजारांपर्यंत करण्यात आली आहे.

(हे वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवली)

म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 आहे त्यांना ESIC कव्हरेज मिळेल. या योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. ही मर्यादा वाढवल्यामुळे कंपन्यांवरील भार कमी होईल. आता साधारण 12.50 लाख कंपन्यांना याचा फायदा मिळत आहे. याआधी केंद्र सरकारने ESIC योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक एकरकमी योगदान जमा झालेले नसतानाही 30 जून 2020 पर्यंत या  कर्मचाऱ्यांना सर्व मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांचा  मासिक पगार 21 हजारांपेक्षा कमी आहे आणि जे कमीत कमी 10 कर्मचारी असणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. 2016 पर्यंत ESIC चा लाभ घेणाऱ्यांसाठी पगाराची मर्यादा 15 हजार होती. 1 जानेवारी 2017 मध्ये ही मर्यादा वाढवून 21 हजार करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून ESIC संदर्भात करण्यात आलेल्या 5  मोठ्या घोषणा

1. सर्व सुविधा मिळणार- ESIC ने अशी घोषणा केली आहे की, लॉकडाऊन काळात कंपन्या भरावी लागणारे वार्षिक एकरकमी योगदान देऊ नाही शकले तरीही कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या मेडिकल सेवा सुरूच राहतील.

(हे वाचा-चीनला मोठा झटका, भारताला विश्व गुरू बनवण्यासाठी पंतप्रधानांचा प्लॅन तयार)

2. एक्सपायर झालेल्या कार्डचा देखील वापर करू शकाल- कर्मचाऱ्यांचे मेडिकल कार्ड ज्याअंतर्गत त्यांना सुविधा मिळतात, त्याची वैधता संपली असली तरीही काळजी करण्याची बाब नाही. जुन्या कार्डावर मिळणाऱ्या सुविधा त्यांना यावेळीही मिळत राहतील.

3. खाजगी मेडिकल दुकानातून घेऊ शकता औषधं-लॉकडाऊनच्या काळात  ESIC ने कर्मचारी आणि अन्य लाभार्थ्यांसाठी प्रायव्हेट मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी करण्याकरता सुविधा उपलब्ध  करून दिली आहे. प्रायव्हेट दुकानांतून औषधं खरेदी केल्यानंतर हे कर्मचारी ESIC मध्ये खर्च केलेल्या पैशांसाठी क्लेम करू शकतात. ज्यांना दररोज औषधं घ्यावी लागतात आणि लॉकडाऊनमुळे रुग्णालयामध्ये जाता येत नाही आहे अशांना मोठा दिलासा मिळेल.

(हे वाचा-घर घेण्याचं स्वप्न लॉकडाऊन नंतर होईल पूर्ण,वाचा फ्लॅट्स स्वस्त होण्याची कारणं)

4. अन्य रुग्णालयांमध्ये होणार उपचार- ज्या रुग्णालयांना कोव्हिड-19 च्या रुग्णालयांमध्ये बदलण्यात आले आहे, त्याठिकाणी उपचार घेणाऱ्यांनी सुद्धा चिंता करण्याचे कारण नाही.  इतर इलाज करणाऱ्या विविध रुग्णालयांमध्ये ESIC योजनेचा लाभ घेणाऱ्यांना उपचार मिळणार आहेत.

5. कंपन्यांना दिलासा-ESIC ने कंपन्यांना दिलासा देत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम भरण्यासाठी कालावधी 15 मे 2020 पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनचे संकट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 6, 2020, 6:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या