मराठी बातम्या /बातम्या /मनी /नाशिकमधील बँकेसह 2 बँकांवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला 50 लाखांपेक्षा जास्त दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

नाशिकमधील बँकेसह 2 बँकांवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला 50 लाखांपेक्षा जास्त दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक आणि गाझियाबादमधील दोन सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने या दोन्ही बँकांकडून मोठा दंड वसूल केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक आणि गाझियाबादमधील दोन सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने या दोन्ही बँकांकडून मोठा दंड वसूल केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक आणि गाझियाबादमधील दोन सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने या दोन्ही बँकांकडून मोठा दंड वसूल केला आहे.

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: आरबीआयने (RBI) लागू केलेल्या काही नियमांचे, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास देशभरातील बँकांवर कारवाई केली जाते. अशीच दंडात्मक कारवाई नाशिकमधील एका सहकारी बँकेवर करण्यात आली आहे. यासब गाझियाबादमधील बँकेवर देखील आरबीआयने सोमवारी ही दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँक आणि गाझियाबादमधील नोएडा कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Janalaxmi Co-operative Bank and Noida Commercial Co-operative Bank, Ghaziabad) मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने या बँकांवर 3 लाख ते 50.35 लाख रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली आहे. बँकेने एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, नाशिकच्या जनलक्ष्मी सहकाही बँकेवर काही नियामक आवश्यकतांचे पालन न केल्यामुळे 50.35 लाख रुपयांची कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचा-लवकर पाहा तुमच्याकडे आहेत का या नाणी, नोटा; घरबसल्याच लखपती बनण्याची मोठी संधी

जनलक्ष्मी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक इंडिया द्वारे 'प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांद्वारे अन्य बँकांमध्ये जमा रकमेचं नियोजन' आणि 'क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांची (ICC) सदस्यता' या संदर्भात जारी निर्देशांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय बँकेने गाझियाबादच्या नोएडा कमर्शिअल सहकारी बँकेवर देखील 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. हा दंड संचालकांशी संबंधित कर्ज आणि व्यवसायाची नवीन ठिकाणे उघडण्यासंदर्भातील तरतुदींचे पालन न करण्यासाठी ठोठावण्यात आला आहे. 31 मार्च, 2019 रोजी सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीसंदर्भातील अहवालाच्या आधारे हे कारण समोर आले आहे, त्यानंतर या बँकांवर दंड ठोठावण्यात आला आहे.

हे वाचा-महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचांदीत घसरण, पाहा सोन्याचा ताजा दर

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित आहे आणि दोन कर्जदात्यांद्वारे त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही कराराची किंवा व्यवहाराटी वैधता स्पष्ट करणे असा याचे उद्दिष्ट्य नाही आहे.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news