• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • लवकर पाहा तुमच्याकडे आहेत का या नाणी, नोटा; घरबसल्याच लखपती बनण्याची मोठी संधी

लवकर पाहा तुमच्याकडे आहेत का या नाणी, नोटा; घरबसल्याच लखपती बनण्याची मोठी संधी

1 ते 100 रुपयांपर्यंतची नाणी, नोटा तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकतात.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑगस्ट : अनेकांना जुनी नाणी (Old Coins), नोटा जमवण्याचा (Old currency note) छंद असतो. तुम्हालाही असा छंद असेल तर हा छंद तुम्हाला आता चांगलाच फायद्याचा ठरणार आहे. तुमच्या याच छंदामुळे तुम्हाला घरबसल्या लखपती होण्याची संधी मिळते आहे. या नोटा (earn money from old note) आणि नाण्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांची ऑनलाईन विक्री करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. 1, 2 आणि 5 रुपयांची दुर्मिळ जुनी नाणी (rare coins), नोटा यांना बाजारात चांगली मागणी आहे. अशा पैशांचा संग्रह करणारे याच्या शोधात असतात आणि ते यासाठी बरीच रक्कम देण्यासाठीसुद्धा तयार असतात. आता तुमच्याकडे कोणती नाणी आणि नोटा असायला हव्यात ते पाहुयात. 1) तुमच्याकडे माता वैष्णो देवीची प्रतिमा असलेली 5 आणि 10 रुपयांचं नाणं आहे का पाहा. या नाण्यासाठी लोक लाखो रुपये द्यायला तयार आहेत. 2) तुमच्याकडे 1 रुपयाची नोट असेल तर तुम्ही 45 हजार रुपये करू शकता. एक रुपयाच्या नोटेचं बंडल ऑनलाइन  45 हजार रुपयांना विकलं जातं आहे. या नोटेवर 1957 मधील आरबीआय गव्हर्नर एचएम पटेल यांची स्वाक्षरी असायला हवी आणि या नोटेचे सीरिअल नंबर  123456 हवा. हे वाचा - आता तुम्हीच ठरवा EMI ची रक्कम, या बँकेची ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर 3) ओएनजीसी (ONGC) चे पाच रुपये आणि दबा रुपयाच्या स्मारक नाण्यांसाठी 200 रुपये मिळत आहेत. 4) 100 रुपयांच्या नोटेतून तुम्ही 1,999 रुपये मिळवू शकता. या नोटेवर 000 786  हा एक असामान्य सीरिज नंबर आहे. यावर आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांचे सही आहे. 5) 1943 साली ब्रिटिश काळात जारी केलेली 10 रुपयांची नोट कॉइनबाज़ार विकून तुम्ही  25,000 कमवू शकता. या नोटेवर आरबीआय गव्हर्नर राहिलेले सीडी देशमुख यांची  सही आहे. नोटेच्या एका बाजूला अशोकस्तंभ आणि दुसऱ्या बाजूला एक बोट आहे. नोटेच्या मागे दोन्ही कोपऱ्यांवर दस रुपए असं लिहिलेलं असायला हवं. 6) 1862 मधील क्विन व्हिक्टोरियाचं नाणं तुमच्याकडे असतील तर क्विकरवर तुम्हाला ग्राहक  1.5 लाख रुपये देण्याच्या तयारीत आहे. 1862 मधील हे एक रुपयाचं चांदीचं नाणं दुर्मिळ श्रेणीत येतं. हे वाचा - वर्षभरात 1 लाखाचे झाले 57 लाख रुपये, हा शेअर विकत घेणं ठरेल फायद्याचं आता तुमच्याकडे यापैकी काही नाणी नोटा असतील तर याची विक्री तुम्ही कशी कराल ते पाहुयात. अशा जुन्या नोटा, नाणी CoinBazar, Indiamart, Quikr  अशा वेबसाईट्सवर विकता येतील. CoinBazzar.com  बाजारवर तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग तुमची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्याजवळ असलेल्या पशांची माहीत आणि तुम्हाला अपेक्षित असलेली किंमत टाकावी लागेल. यानंतर ग्राहक थेट तुमच्याशी संपर्क करतील. (सूचना - ही बातमी वेबसाइटवर मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही)
  Published by:Priya Lad
  First published: