जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचांदीत घसरण, पाहा सोन्याचा ताजा दर

महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचांदीत घसरण, पाहा सोन्याचा ताजा दर

Gold Rate Today

Gold Rate Today

गेल्या आठवड्यात काही प्रमाणात दर वाढल्यानंतर नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (First trading day) सोनं आणि चांदीच्या (Gold and Silver) किंमतीत घसरण (Fall) झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : गेल्या आठवड्यात काही प्रमाणात दर वाढल्यानंतर नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (First trading day) सोनं आणि चांदीच्या (Gold and Silver) किंमतीत घसरण (Fall) झाली आहे. सोमवारच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव 47 हजार रुपये (Rs. 47 thousand) प्रति तोळा, तर चांदीचा भाव 66 हजार 473 रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या शुक्रवारी संपलेल्या सत्रात सोन्याचा भाव 47 हजार 41 रुपये एवढा होता. तर चांदीची किंमत 66 हजार 491 रुपये होती. भारतीय कमोडिटी बाजाराप्रमाणे जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर मात्र स्थिर असून त्यात कुठलाही बदल झालेला नाही. अमेरिकेतील गुंतवणुकीवरील व्याजदर घटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सोन्याचांदीत येऊ लागल्याची चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांत दर वाढल्याने अनेकांनी सोनं विकलं असावं, असा अंदाज व्यक्त होत आहे. सराफा बाजारावरही परिणाम शेअर बाजारातील या चढउतारांचा सराफा बाजारातील दरांवरही साहजिकच परिणाम झाला आहे. सोन्याच्या दरात शुक्रवारच्या तुलनेत 124 रुपयांची घट झाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचे दर आता 47 हजारांच्या खाली गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1808 डॉलर प्रति अंस आहेत. दर पडण्याचे कारण डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचांदीचे दर घसरल्याचं एचडीएफडी सिक्युरिटीजचे सिनिअर ऍनालिस्ट तपन पटेल यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणं न्यूयॉर्कमध्ये कमोडिटी एक्सचेंजमध्ये दर पडल्याचा परिणामही भारतीय बाजारांवर जाणवला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे वाचा - SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या, अकाऊंटमध्ये कमी Balance ठेवणं पडेल भारी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चिंता नाही सोन्याच्या आणि चांदीच्या दरातील चढउतार हा नित्याची बाब असून दीर्घकालीन गुंतवणूकदारांना काळजी करण्याची गरज नसल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. दरातील प्रत्येक घसरण ही नव्या खरेदीची संधी मानावी, असा सल्लाही गुंतवणूक तज्ज्ञ देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात