Home /News /money /

Silver Lake चे सह-गुंतवणूकदार करणार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची गुंतवणूक

Silver Lake चे सह-गुंतवणूकदार करणार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची गुंतवणूक

Reliance Retail Deal : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) मध्ये सिल्व्हर लेक पार्टनर्सचे सह-गुंतवणूकदार 1875 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्स स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबात माहिती देण्यात आली.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : रिलायन्स समूहाने (RIL) बुधवारी अशी माहिती दिली आहे की, प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेक (Silver Lake Partners)चे सह-गुंतवणूकदार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहेत. यानंतर RRVL मध्ये सिल्व्हर लेक आणि त्यांच्या सह-गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकूण 9375 कोटींवर पोहोचली आहे. आता सिल्व्हर लेकची रिलायन्स रिटेलमधील एकूण भागीदारी 2.13 टक्के झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी करण्यात आलेली ही दुसरी आणि गेल्या 3 आठवड्यातील चौथी गुंतवणूक आहे. रिलायन्स स्टॉक एक्सचेंज फायलिंग (Stock Exchange Filing) मध्ये दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेल प्री-इक्विटी मुल्य  4.285 लाख कोटी आहे. या कराराबद्दल आरआयएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणाले की, "सर्व भारतीयांना लाभ देणाऱ्या भारतीय रिटेल क्षेत्रासाठी सिल्व्हर लेक आणि त्यांचे सह-गुंतवणूकदार बहुमूल्य भागीदार आहेत. त्यांचा विश्वास आणि समर्थन मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. ग्लोबल टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टिंग अँड रिटेल रिव्हॉल्यूशन मध्ये त्यांच्या नेतृत्त्वाचा फायदा आम्हाला मिळेल. सिल्व्हर लेकची ही अतिरिक्त गुंतवणूक भारतीय रिटेल क्षेत्रात रिलायन्स रिटेलची क्षमता दर्शवते.'' (हे वाचा-3 मित्रांनी 4 वर्षात प्रसिद्ध केला कॉफी ब्रँड, आहे कोट्यवधींची कमाई सिल्व्हर लेक या इक्विटी फर्मचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी एगॉन डर्बन म्हणाले की, 'या मोठ्या संधीसाठी भागीदारी वाढवताना आणि आमच्या सह-गुंतवणूकदारांना याकरता एकत्र आणताना आम्हाला आनंद झाला आहे. गेल्या काही आठवड्यांतील निरंतर गुंतवणूकीमुळे रिलायन्स रिटेलचे व्हिजन आणि व्यवसाय मॉडेल काय आहे हे स्पष्ट झाले आहे. ही कंपनी आपल्या नवीन आणि परिवर्तनशील वाणिज्य उपक्रमांतर्गत प्रचंड संभाव्यता अधोरेखित करते.' (हे वाचा-कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आता कपात होणार नाही? वाचा काय आहे सत्य अद्याप हा व्यवहार नियामक मंजुरींच्या अधीन आहे. यामध्ये मॉर्गन स्टेनलीने रिलायन्स रिटेलच्या आर्थिक सल्लागाराची भूमिका साकारली. तर, सिरिल अमरचंद मंगलदास  (Cyril Amarchand Mangaldas)आणि डेव्हिस पोल्क अँड वार्डवेल (Davis Polk & Wardwell) यांनी कायदेशीर सल्ला दिला आहे. लॅथम अँड वॅटकिन्स (Latham & Watkins) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी (Shardul Amarchand Mangaldas & Co) यांनी सिल्व्हर लेकसाठी कायदेशीर सल्लागाराची भूमिका बजावली. रिलायन्स रिटेलमध्ये गेल्या काही आठवड्यांत परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी गुंतवणूक झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या या रिटेल व्यवसायाने गेल्या काही आठवड्यांत एकूण 13,050 कोटी रुपये कमावले आहेत. हा निधी खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक पार्टनर्स आणि अमेरिकन कंपनी केकेआर अँड कंपनीकडून आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये अनुक्रमे 1.75 टक्के आणि 1.28 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. (हे वाचा-सामान्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबर महिन्यात असे असणार LPG घरगुती गॅसचे दर) 30 सप्टेंबर रोजी अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अ‍टलांटिक (General Atlantic) रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मध्ये 3675 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. या गुंतवणुकीनंतर GAची  रिलायन्स रिटेलमध्ये 0.84 टक्के भागीदारी असेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance Industries Limited

    पुढील बातम्या