सामान्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबर महिन्यात असे असणार LPG घरगुती गॅसचे दर, वाचा इथे

सामान्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबर महिन्यात असे असणार LPG घरगुती गॅसचे दर, वाचा इथे

LPG Gas Cylinder Price 01 October 2020- देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL,BPCL, IOC) ऑक्टोबर महिन्यासाठी सब्सिडी आणि बिना सब्सिडी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमती जारी केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत (LPG Gas Cylinder Price 01 October 2020) ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी  (HPCL, BPCL, IOC) एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम बिना सबसिडीच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. मुंबईमध्ये देखील या गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. IOC च्या वेबसाइटनुसार हे दर आहेत.

याआधी जुलै महिन्यात 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढवण्यात आली होती. जून महिन्यात 14.2 किलोग्रॅम बिना-सबसिडीचा सिलेंडर 11.50 रुपयांनी महागला होता.

काय आहेत नवे दर (LPG Price in India 01 October 2020)-

देशातील सर्वात मोठी तेल मार्कटिंग कंपनी IOC च्या वेबसाइटनुसार सिलेंडरच्या किंमती स्थीर आहेत. सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये 594 रुपये, दिल्लीमध्ये देखील 594 रुपये, चेन्नईमध्ये 610 रुपये तर कोलकातामध्ये 620.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.

19 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ

दिल्ली- देशाच्या राजधानीत 19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1133.50 रुपयावरून वाढून 1166 रुपये झाले आहे. यामध्ये 32 रुपयांनी वाढ झाली आहे.

मुंबई-  मुंबईमध्ये या घरगुती सिलेंडरची किंमत 24.50 रुपयांनी वाढून दर 1089 रुपयांवरून 1113.50 रुपयांवर पोहोचले आहेत

(हे वाचा-आजपासून बदलणार तुमच्याशी संबंधित हे 10 नियम, खिशावर होणार थेट परिणाम)

कोलकाता- याठिकाणी 19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1196 रुपयावरून वाढून 1220 रुपये झाली आहे. यामध्ये 24रुपयांनी वाढ झाली आहे.

चेन्नई- याठिकाणी या घरगुती सिलेंडरची किंमत 26  रुपयांनी वाढून दर 1250 रुपयांवरून 1276 रुपयांवर पोहोचले आहेत

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 1, 2020, 10:37 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading