मराठी बातम्या /बातम्या /मनी /International Coffee Day: 3 मित्रांनी 4 वर्षात प्रसिद्ध केला कॉफी ब्रँड, आहे कोट्यवधींची कमाई

International Coffee Day: 3 मित्रांनी 4 वर्षात प्रसिद्ध केला कॉफी ब्रँड, आहे कोट्यवधींची कमाई

International Coffee Day 2020: दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक कॉफी दिवस साजरा केला जातो. यादिवशी जाणून घेऊया कॉफी व्यवसायात 4 वर्षांतच करोडोंची कमाई करणाऱ्या तीन मित्रांबद्दल

International Coffee Day 2020: दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक कॉफी दिवस साजरा केला जातो. यादिवशी जाणून घेऊया कॉफी व्यवसायात 4 वर्षांतच करोडोंची कमाई करणाऱ्या तीन मित्रांबद्दल

International Coffee Day 2020: दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक कॉफी दिवस साजरा केला जातो. यादिवशी जाणून घेऊया कॉफी व्यवसायात 4 वर्षांतच करोडोंची कमाई करणाऱ्या तीन मित्रांबद्दल

मुंबई, 01 ऑक्टोबर : एक चांगली कॉफी प्यायला मिळावी ही इच्छा एखाद्याला करोडपती बनवू शकते, असे एखाद्याला सांगितले तर खोटे वाटेल. पण मित्रांच्या एका त्रिकुटाने हे सत्यात उतरवले आहे. कॉलेजच्या दिवसात केवळ चांगली कॉफी मिळावी ही निर्माण झालेली इच्छा त्यांनी बिझनेस स्टाार्टअपमध्ये बदलली आहे. अश्वजीत सिंह, अजित आणि अरमान सूद या त्रिकुटाने 2016 मध्ये त्यांचं स्वप्न सत्यात आणलं आणि कॉफी व्यवसाय सुरू केला. त्यांचा स्लिपी आऊल नावाचा ब्रू कॉफी स्टार्टअर आज 4 वर्षांनी अनेकांची वाहवा मिळवत आहे.

गेल्या दोन वर्षात Sleepy Owl ची ग्रोथ 100 टक्क्याहून देखील जास्त आहे. भारतात ज्याठिकाणी चहाचा एक 'फॅनबेस' आहे, अशा ठिकाणी कॉफीची आवड निर्माण करणे तसे कठीण आहे. एक नवीन ब्रँड लोकांच्या पसंतीस उतरण्यात देखील वेळ जातो. पण या त्रिकुटाने या सर्व गोष्टींचा सामना करत त्यांच्या ब्रँडचे नाव प्रसिद्धीस आणले आहे.

अशी झाली सुरुवात

Sleepy Owl चे सेटअप करण्यासाठी त्यांना सुरुवातीला 12 लाख रुपये गुंतवावे लागले. स्वत:चे सेव्हिंग आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्यांनी ही रक्कम गुंतवली. त्यानंतर डीएसजी पार्टनरकडून मिळालेल्या 3.5 कोटींच्या फंडिंगमुळे त्यांचा व्यवसाय वेगाने प्रगती करू लागला.

(हे वाचा-नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी! सरकारचे नवीन नियम न पाळल्यास नाही होणार अप्रेजल)

25 हजार ग्राहकांपर्यंत त्यांचा व्यवसाय पोहोचला आहे. सध्या त्यांचे प्रोडक्ट 100 रिटेल स्टोअर्सपर्यंत पोहोचले आहे, 2 वर्षात या स्टोअर्सची संख्या 1000 करण्याचा त्यांचा मानस आहे. लोकांच्या घरी आणि ऑफिसमध्ये देखील या ब्रँडचा वापर केला जावा असे या व्यवसायाचे ध्येय आहे. सध्या कंपनी नवीन फ्लेवर्सवर काम करत आहे.

व्यवसाय कसा वाढवला?

ग्राहकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचावे याकरता Sleepy Owl बी2बी आणि बी2सी प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. त्यांचे प्रोडक्ट त्यांच्या वेबसाइट प्रमाणेच Amazon वर देखील उपलब्ध आहेत. बी2बी अंतर्गत कंपनीने कॅफे आणि काही रेस्टॉरंट्सबरोबर देखील करार केला आहे शिवाय कॉर्पोरेट ऑफिसबरोबर देखील त्यांनी करार केला आहे. Sleepy Owl सध्या पॉप अप बेसिसवर केपीएमजी, कॉमिक कॉनवर उपलब्ध आहे. रिटेल मार्केटमध्ये स्लीपी आऊल फूडहॉल, मॉडर्न बाजार सारख्या मोठ्या रिटेल स्टोअर्सबरोबरच लोकल दुकानात देखील उपलब्ध आहेत.

अशी बनते कॉफी

Sleepy Owl कोल्ड ब्रू कॉफीसाठी अरेबिका बीन्सचा वापर करतात. इन्स्टंट कोल्ड ब्रू कॉफी बनवण्यासाठी फार्म फ्रेश बीन्स ग्राइंड करून त्या 20-24 तासांपर्यंत ब्रू केल्या जातात Sleepy Owl चे वैशिष्ट्य असे आहे की ही बनवण्यासाठी उष्णतेचा वापर केला जात नाही.

(हे वाचा-कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आता कपात होणार नाही? वाचा काय आहे सत्य)

ज्यामुळे कॉफीचा कडवटपणा कमी होतो आणि फ्लेवर उत्तम राहतो. कंपनी ही कॉफी सेल्फ ब्रू आणि रेडी टू ड्रिंक, दोन्ही प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवते.

काय आहे उत्पन्न?

Sleepy Owl विविध प्लॅटफॉर्मवरून उत्पन्न कमावते. यातील 60-70 टक्के उत्पन्न ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मिळते. ब्रँड लॉयल्टी वाढवण्यासाठी कंपनीने सब्सक्रिप्शन मॉडेल देखील सुरू केले आहे, ज्यामध्ये दर 7 किंवा 15 दिवसांनी कॉफी डिलिव्हर केली जाते.  कंपनीचे नाव आणि पॅकेजिंग देखील ग्राहकांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरत आहे.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Startup