नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Price) 1,182 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. तर चांदीचे भाव (Silver Prices Today) 1500 रुपयांनी वाढले आहेत.
तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलरचे मुल्य घसरल्यामुळे आणि जगभरातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffet) यांची कंपनी हाथवे बर्कशायरच्या (Hathaway Berkshire) एका मोठ्या करारानंतर सोन्याच्या किंमतींना आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढून 1980 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचल्या आहेत.
(हे वाचा-Facebook मध्ये दिसेल TikTok सारखे फीचर! शॉर्ट व्हिडीओ बनवण्याबाबत टेस्टिंग सुरू)
त्याचप्रमाणे तज्ज्ञांचे मते सोन्याच्या वाढत्या किंमतींचा काळ अद्याप संपलेला नाही आहे. सद्यपरिस्थिती पाहता सोन्याच्या किंमती 2020 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किंमती वाढू शकतात. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोन्याचे नवे भाव (Gold Price on 18th August 2020)
एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के सोन्याची किंमत 53,674 रुपये प्रति तोळावरून 54,856 रुपये प्रति तोळा झाला आहे. सोन्याच्या किंमती 1182 रुपये प्रति तोळाने वाढल्या आहेत. मुंबईमध्ये सोन्याच्या किंमती वाढून 53894 रुपये प्रति तोळा झाले आहेत.
चांदीचे नवे भाव (Silver Price on 18th August 2020)
मंगळवारी सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चांदीच्या किंमती 1587 रुपये प्रति किलोने वाढल्या आहेत. त्यामुळे चांदीचे भाव 70,960 रुपयांवरून 72,547 रुपये प्रति किलो झाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचे दर 69,496 रुपये प्रति किलो आहेत.
पुन्हा का वाढल्या सोन्याचांदीच्या किंमती?
एचडीएफसी सिक्योरिटीज के सीनिअल अनॉलिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांच्या मते अमेरिकन डॉलरचे मुल्य घसरल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढत्या किंमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.
(हे वाचा-महिला असल्यामुळे नाकारली होती नोकरी, स्वत: उभारली 50 हजार कोटींची कंपनी)
सध्या सोन्याच्या किंमती वाढण्याचा काळ सुरू आहे. जगभरातील अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशावेळी भारतीय बाजारात सोन्यामध्ये पुन्हा एकदा उसळी येऊ शकते. मात्र ही तेजी मर्यादित राहिल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.