जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI, RBI आणि इतर बँकांमध्ये 12,899 व्हेकन्सी, 'इथे' करा अर्ज

SBI, RBI आणि इतर बँकांमध्ये 12,899 व्हेकन्सी, 'इथे' करा अर्ज

SBI, RBI आणि इतर बँकांमध्ये 12,899 व्हेकन्सी, 'इथे' करा अर्ज

SBI, RBI - तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर चांगली संधी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 सप्टेंबर : सरकारी बँकेत तुम्ही नोकरी शोधताय का? मग तुम्हाला भरपूर संधी आहे. अनेक सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यात आयबीपीएसद्वारे भरती, एसबीआय आणि रिझर्व्ह बँक यांचा समावेश आहे. आयबीपीएस 12 हजार क्लार्क पदांवर तुमची परीक्षा घेईल. आयबीपीएस क्लार्क पदासाठी अर्ज सुरू केलेत. स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) 700 पदांवर भरती होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B साठी 199 पदांवर व्हेकन्सी आहे. मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण या सर्व व्हेकन्सी मिळून 12899 पदांवर भरती IBPS क्लार्कच्या 12 हजार पदांवर भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालंय. अर्ज करण्यासाठी www.ibps.in इथे क्लिक करा. या व्हेकन्सीद्वारे आंध्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, इलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, भारतीय बँक, पंजाब आणि सिंध बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये नोकरी आहे. कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा, मिळाली ‘इतकी’ मदत SBI मध्ये अप्रेंटिससाठी 700 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर अर्ज स्वीकारणं सुरू आहे. अर्जाची शेवटची तारीख आहे 6 ऑक्टोबर 2019. sbi.co.in/career वर जाऊन अर्ज करा. SBI चं नोटिफिकेशन पाहायला https://sbi.co.in/webfiles/uploads/files/careers/2019_09_1225_SBI_Web_Page_Engagement_of_Apprentices_Notice.pdf इथे क्लिक करा. ‘या’ तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B (DR)च्या ऑफिसर पदांसाठी 199 व्हेकन्सीज आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अर्ज करण्यासाठी rbi.org.in इथे अर्ज करा. RBI चं नोटिफिकेशन https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3766 इथे पाहा. VIDEO :…म्हणून ईडी कार्यालयात जाणार होतो, पवारांचा खुलासा आणि मानले सेनेचे आभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात