'या' तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन

'या' तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन

Income Tax Return - इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं ITR भरण्याची तारीख वाढवलीय

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : तुम्ही अजून इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर अजिबात काळजी करू नका. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) नं ही माहिती दिलीय की ITR भरण्याची तारीख 1 महिन्यानं वाढवलीय. याआधी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती 30 सप्टेंबर 2019. आता ही तारीख आहे 31 ऑक्टोबर 2019. ज्या लोकांच्या अकाउंटच्या ऑडिटिंगची गरज आहे त्यांच्यासाठी ही तारीख आहे. फक्त टॅक्स रिटर्नच नाही. तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याचीही हीच तारीख आहे.

ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचा सिलसिला सुरूच, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

PMC बँकेच्या खातेधारकांना दिलासा,आता काढू शकणार एवढे पैसे

इन्कम टॅक्स विभागानं पुन्हा एकदा सगळ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. आयटी विभागानं येणाऱ्या खोट्या मेसेजपासून सावध केलंय.काही लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसंदर्भात खोटे ईमेल आणि SMS येतायत. ते खरे नाहीयत. म्हणूनच आयकर विभागानं जनतेला सावध केलंय.

HDFC बँकेनं लाँच केलं नवं कार्ड, मिळतील 'हे' फायदे

मेसेजमध्ये लिहिलंय की, असा मेसेज येतो ज्यात एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करून टॅक्स रिफंड मिळेल, असं लिहिलं असतं. Url http://151.80.90.62/ITRefund असंही दिलं असतं. पण आयकर विभागानं म्हटलंय की यावर चुकूनही क्लिक करू नका.

शरद पवारांबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या