कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा, मिळाली 'इतकी' मदत

कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्सचा सहारा,  मिळाली 'इतकी' मदत

Imran Khan, Bill Gates, Pakistan - बिल गेट्सनी पाकिस्तानाला मदत केलीय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

न्यूयाॅर्क, 27 सप्टेंबर : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी फारसं काही चांगलं चाललेलं नाहीय. दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय मंचावर ते वेगळे पडलेत. पण पाकिस्तानासाठी एक चांगली बातमीही आहे. कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला मायक्रोसाॅफ्टचे संस्थापक बिल गेट्स आर्थिक मदत देणार आहेत. बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे पाकिस्तानला 200 मिलियन डाॅलरची मदत मिळणार आहे.

रेडिओ पाकिस्तानच्या बातमीनुसार गुरुवारी (26 सप्टेंबर) बिल गेट्ससोबत इम्रान खाननं एक एमओयू साइन केलंय. हे पैसे पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या गरिबी दूर करण्याचं अभियान एहसासला दिले जातील. हा फंड 2020पर्यंत खर्च करेल. इम्रान खान म्हणाले, पाकिस्तानात गरिबी हटाव हा मोठा कार्यक्रम आहे. यावेळी त्यांनी बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे आभार मानलेत.

'या' तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन

महागाई आकाशाला

कंगाल पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी झाल्यानं पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाईचे उच्चांक गाठले आहेत. वाढत्या महागाईचे चटके मात्र पाकिस्तानातील जनतेच्या खिशाला बसत आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचा सिलसिला सुरूच, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

6 लाख कोटींचं कर्ज

देश चालवण्यासाठी पाकिस्तान सारखा कर्ज घेतोय. मार्च 2019 पर्यंत पाकिस्तानवर 6 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. पाकिस्ताननं पश्चिम युरोप आणि मध्य पूर्वेच्या देशांकडून मोठं कर्ज घेतलंय. पाकिस्तानने सर्वात जास्त कर्ज चीनकडून घेतलंय. याशिवाय आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही कर्ज घेतलंय.

HDFC बँकेनं लाँच केलं नवं कार्ड, मिळतील 'हे' फायदे

दूध 180 रुपये लिटर

कराची डेरी फार्मसी असोसिएशनने दुधाच्या दरात लिटरमागे 23 रुपयांची वाढ केली आहे. दुधाचे भाव डेअरीत 120 तर बाजारात 180 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वारंवार दुधाचे दर वाढवण्याची मागणी करूनही पाकिस्तान सरकारनं दुर्लक्ष केल्यानं ही दरवाढ करावी लागत असल्याचं कराची डेरी फार्मसी असोसिएशनचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे इतक्या महाग दरात दूध विकणाऱ्या असोसिएशन, दुकानदारांवर कारवाई केली जात आहे असं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

बँकाही बेजार

मार्च 2019 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 9.41 टक्के होता. वारंवार वाढणाऱ्या महागाईमुळे पाकिस्तानमधील बँकांनी व्याजदरही 10.75 टक्के केला आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचं बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट आलं आहे.पाकिस्तान दहशतवादाल थारा देत असल्यानं भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची निर्यात बंद केली होती.

SPECIAL REPORT : 'या' अवलियाच्या टाइपिंगमधून तयार होतात पोट्र्रेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Sep 27, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading