मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण

मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण

Baleno RS कारचं कंपनीकडून उत्पादन बंद. तर मारुती कंपनीच्या कारवर 1 लाख रुपयांची सूट.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर: मारुती सुझुकी देशातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणारी कंपनी. या कंपनीने सणांच्या निमित्तानं अनेक गाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काऊंट दिले आहेत. अगदी ग्राहकांना परवडणाऱ्या गाड्यांपासून महागड्या गाड्यांपर्यंत मारुती सुझुकी या सणांना खास ऑफर्स आणि गाड्यांच्या खरेदीवर विशेष सूट घेऊन आलं आहे. आताच्या घडीला सगळ्यात जास्त विकली जाणारी आणि लोकप्रिय असणाऱ्या गाड्यांपैकी एक म्हणजे बलेनो. या गाडीच्या मॉडेलवर कंपनीकडून तब्बल 1 लाखांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

बलेनो व्यतिरिक्तही कंपनीने विटारा, ब्रेजा, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, बलेनो आणि सिलेरियो या गाड्यांच्या खरेदीवरही मोठी सूट दिली आहे. याशिवाय रोख रक्कम देणाऱ्यांसाठी आणि चेक किंवा कार्डद्वारे पैसे भरणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर्स असणार आहेत. त्यामुळे या सणासुदीला गाडी खरेदी करताना ऑफर्स पाहून खरेदी केली तर तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

फायनांशियर एक्सप्रेसने दिलेल्या एका बातमीनुसार प्रीमियम हॅचबॅक बलेनो या मॉडेलचं उत्पादन भारतामध्ये बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मागच्या काही महिन्यांपासून या गाडीचं एकही मॉडेलचं प्रोडक्शन झालं नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बाजारात हॅचबॅक बलेनो गाडीचे जे मॉडेल्स उपलब्ध आहेत त्यांच्यावर 1 लाख रुपयांची सूट दिली जात आहे.

'या' तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन

कंपनीच्या वेबसाईटवरील गाड्यांच्या मॉडेल लिस्टमधून या गाडीला वगळण्यात आलं आहे. या मॉडेलला ग्राहकांची जास्त मागणी नसल्यामुळे कंपनीने ह्या कारचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बलेनो गाडीचं उत्पादनही बंद आहे. RS मॉडल बलेनो के स्टँडर्ड वेरिेंट कमीत कमी 1.30 लाख रुपये महाग आहे. याशिवय याचा मेंटेन्स महाग असल्यानं ग्राहकांची पसंती या कारला कमी आहे.

Baleno RS कारचं मॉडेल भारतात 2017 साली लाँच करण्यात आलं होतं.1.0-litre, 3 सिलेंडर, टर्बोचार्ज इंजिनचा या कारमध्ये समावेश आहे.101 पर्यंत पावर देते. स्टँडर्ड मारुती सुझुकी बनेलो कारमध्ये 1.2 लिटर, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन जे 82hp पावर देतात आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करतात. बलेनोच्या अनेक मॉडेल्स वेगवेगळ्या व्हेरिएन्टमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांची एकूण पसंती पाहता त्याची खरेदी त्या तुलनेनं कमी झाली असल्यानं कंपनीने बलेनो कार मॉडेलचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या